राष्ट्रवादीची वाढती ताकद विरोधकांना खपत नाही; प्रदीप गारटकर यांची विरोधकांवर टीका Pudhari
पुणे

Political News: राष्ट्रवादीची वाढती ताकद विरोधकांना खपत नाही; प्रदीप गारटकर यांची विरोधकांवर टीका

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत गारटकर बोलत होते.

पुढारी वृत्तसेवा

टाकळी भीमा: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढत असून संघटना मजबूत होत असल्याचे विरोधकांना खपत नसल्याने अजित पवार यांना टार्गेट करण्यासाठी नवनवीन प्रकरणे उकरून काढत स्वतःची जागा निर्माण करण्याचे काम सध्या विरोधकांकडून केले जात आहे, असे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत गारटकर बोलत होते. (Latest Pune News)

ते पुढे म्हणाले, शिरूर तालुक्यातील अडचणी अजित पवार यांच्याकडून सोडवून घेऊन रखडलेला विकास साध्य करण्यासाठी पदाधिकार्‍यांनी पक्ष संघटना मजबूत करावी. येणार्‍या काळात निवडणुकांसाठी सामोरे जावे यासाठी पक्षाचे जास्तीत जास्त क्रियाशील सभासद वाढून 10 जून रोजी शिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मोठे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी जास्त संख्येने उपस्थित राहावे

या वेळी शिरूर तालुका अध्यक्ष रवींद्र काळे, महेश ढमढेरे, श्रुतिका झांबरे, राजेंद्र कोरेकर, अण्णा महाडिक यांची भाषणे झाली. तसेच या वेळी कात्रज दूध संघाचे चेअरमन स्वप्निल ढमढेरे, श्रीनिवास घाडगे, शरद कालेवार, स्वप्निल गायकवाड, आबाराजे मांढरे, शिरूर तालुका युवक अध्यक्ष राहुल रणदिवे, आरती भुजबळ, सुधीर फराटे, विजय ढमढेरे, निखिल तांबे, राजेंद्र नरवडे, सुनील ढमढेरे, राजेंद्र गव्हाणे, नारायण फडतरे, दुर्गेश भुजबळ आदी मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.

या वेळी काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाच्या पक्षात प्रवेश केला. या दरम्यान शिरूर तालुका अध्यक्ष रवींद्र काळे यांनी पक्षातील काही नवीन पदाधिकार्‍यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT