Auto Taxi Driver Scheme Pudhari
पुणे

Auto Taxi Driver Scheme: पुण्यातील ज्येष्ठ रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी खुशखबर; सन्मान निधी योजनेतून मिळणार 10 हजार रुपये

आरटीओचे नोंदणी करण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सीचालक मालक कल्याणकारी मंडळांतर्गत पात्र ठरणाऱ्या ज्येष्ठ सभासदांना 10 हजार रुपये इतका लाभ सन्मान निधी योजनेअंतर्गत दिला जाणार आहे.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जिल्ह्यातील सर्व पात्र रिक्षा व टॅक्सीचालकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी तातडीने ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

पात्रतेचे निकष काय आहेत?

ज्या रिक्षा किंवा टॅक्सीचालक-मालक सभासदांनी 1 जानेवारी 2026 रोजी वयाची 65 वर्षे पूर्ण केली आहेत. ज्यांनी 1 मे 2026 पर्यंत धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सीचालक-मालक कल्याणकारी मंडळाकडे आपली अधिकृत सभासद नोंदणी पूर्ण केली आहे, अशा ज्येष्ठ सभासदांना 10 हजार रुपये लाभ मिळणार आहे.

अर्जदाराकडील आवश्यक कागदपत्रे

  • ड्रायव्हिंग लायसन्स (अनुज्ञप्ती)

  • आरटीओ बॅज व परवाना (परमिट)

  • आधार कार्ड

  • पॅन कार्ड

  • रेशन कार्ड

  • बँक खाते तपशील (बँक पासबुक/कॅन्सल चेक)

येथे करावी लागणार ऑनलाईन नोंदणी

या योजनेचा थेट लाभ मिळवण्यासाठी पात्र धारकांनी मंडळाच्या http:///ananddighekalyankarimandal.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन सभासद नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच, लाभ थेट खात्यात जमा होणार असल्याने सभासदांनी याच संकेतस्थळावर जाऊन आपल्या बँक खात्याची माहिती अद्ययावत करावी, असे आरटीओ प्रशासनाने केले आहे.

शासनाने सुरू केलेली ही योजना रिक्षा आणि टॅक्सीचालकांना वृद्धापकाळात आर्थिक आधार देणारी आहे. पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी परवानाधारकांनी मंडळाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून या सन्मान निधीचा लाभ घ्यावा.
- स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT