पुणे

टास्क फ्रॉड: पार्ट टाईम नोकरीचं आमिष पडलं महागात ! तरुणीने गमाविले 60 लाख

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पार्ट टाईम नोकरीच्या आमिषाने सायबर चोरट्याने एका आयटी अभियंता तरुणीला टास्क फ्रॉडच्या जाळ्यात ओढून तब्बल 59 लाख 64 हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी हडपसर येथील 28 वर्षीय तरुणीने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 16 ते 29 एप्रिल या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून घडली.

पार्ट टाईम जॉब देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी फिर्यादी तरुणीसोबत टेलिग्रामद्वारे संपर्क साधला. त्यानंतर त्यांना पेड टास्क देऊन वेळोवेळी तब्बल 59 लाख 64 हजार रुपये ट्रान्स्फर करून घेतले. दरम्यान, गुंतवणूक केलेल्या पैशावर मोबदला आणि मूळ रक्कम परत मिळत नाही, हे लक्षात आल्यानंतर तिने सायबर पोलिसांत धाव घेत तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सावंत तपास करीत आहेत.

तरुणालाही घातला 10 लाखांचा गंडा
संतोषनगर (कात्रज) येथील एका 29 वर्षीय तरुणाला सायबर चोरट्यांनी अशाचप्रकारे जाळ्यात ओढून 10 लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. व्हिडीओ लाईक आणि सबस्क्राईब करण्याच्या बहाण्याने पैसे मिळतील, असे सांगून टास्क फ्रॉडद्वारे ही फसवणूक केली.

हे ही वाचा : 

SCROLL FOR NEXT