तळेगाव दाभाडे : पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी पदाचा पदभार शिल्पा शेडगे यांनी स्वीकारला आहे.शेडगे यापूर्वी पुणे येथील निरंतन शिक्षण विभागातील सहायक प्रकल्प अधिकारी पदावर कार्यरत होत्या.
नगर परिषद शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले. तळेगाव दाभाडे परिसर हे शिक्षणाचे मुख्य केंद्र असून याठिकाणी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
https://youtu.be/uRpprmHUGnM