पुणे

तळेगावचा परिसर पावसाच्या प्रतिक्षेत !

अमृता चौगुले

तळेगाव स्टेशन(पुणे); पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे परिसर हा निसर्ग संपन्न असुन येथील निसर्ग बहरतच चालला आहे. परिसरात डोंगररांग असून माळरान, पठारही आहेत. दरवर्षी पाऊस पडला की, डोंगरावर गवत उगवुन येथील परिसर हिरवागार होतो. तसेच नद्या, ओढे, नाले, धबधबे यामुळे या परिसरातील निसर्ग आणखीनच बहरतो.

सध्या कडक उन्हाळा असुन तापमान वाढत आहे. यामुळे डोंगर आणि परिसर पावसाच्या प्रतिक्षेत आहे. श्री घोरावाडीश्वर डोंगर, श्री चौराई माता डोंगर, श्री हरणेश्वर टेकडी, श्री क्षेत्र भंडारा डोंगर, श्री भामचंद्र डोंगर असे अनेक डोंगर आहेत. या डोंगरात ससे, हरणे, कोल्हे अशा वेगवेगळ्या प्राण्यांचा वावर आहे. पाऊस वेळेवर पडला नाहीतर या प्राण्यांचेही पाण्यावाचून हाल होतात.

तसेच तळेगाव स्टेशन तलावही पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. या तलावातील पाणी कमी झालेले असून तो ही पावसाच्या प्रतिक्षेत आहे. तळेगाव परिसरातील ही अनमोल नैसर्गिक संपत्ती आहे. पाऊस पडला की गवत उगवून डोंगर हिरवेगार होतात आणि पर्यटकांना आकर्षित करतात. लोणावळा, कार्ला, पवनानगर येथे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ आता तळेगाव परिसरातही वाढला आहे. पाऊस पडला की डोंगरावर गवत उगवून डोंगर हिरवागार होऊन जनावरांचा चा-याचा प्रश्न ब-यापैकी आवाक्यात येतो. यामुळे बळीराजाही पावसाची वाट अतुरतेने पहात आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT