Swargate Metro Water Leakage Pudhari
पुणे

Swargate Metro Water Leakage: पुण्यात मुसळधार पावसाचा फटका! स्वारगेट मेट्रो स्टेशनमध्ये पावसाच्या पाण्याची गळती

बांधकाम अंतिम टप्प्यात असताना गळतीची घटना; व्हिडिओ व्हायरल, महामेट्रोकडून तांत्रिक तपासणी सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुण्यात मुसळधार पावसाचा फटका मेट्रो प्रकल्पालाही बसू लागल्याचे समोर आले आहे. सध्या बांधकामाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या स्वारगेट मेट्रो स्टेशनमध्ये पावसाच्या पाण्याची गळती झाल्याची घटना मंगळवारी (दि.७) समोर आली.

अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाचे मेट्रो स्टेशनमध्ये अशाप्रकारे गळती झाल्यामुळे मेट्रो प्रवाशांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून, प्रवाशांनीच यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

स्वारगेट हे पुणे मेट्रोचे महत्त्वाचे स्थानक मानले जाते. भविष्यात हजारो प्रवाशांची ये-जा या स्थानकातून होणार असल्याने या प्रकल्पाकडे विशेष लक्ष आहे. मात्र, स्टेशनचे काम अद्याप सुरू असतानाच पावसाचे पाणी आत झिरपत असल्याचे समोर आल्याने प्रवाशांनी चिंता व्यक्त केली जात आहे.

पावसाचे पाणी रोखण्यासाठी आवश्यक जलरोधक व्यवस्था, बांधकामाची गुणवत्ता आणि तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी मेट्रो प्रवाशांकडून केली जात आहे.

स्वारगेट मेट्रोस्थानकाचे बांधकाम अद्याप सुरू आहे. घरी आहे का मंगळवारी येथे पावसाच्या पाण्याची गळती झाल्याची घटना निदर्शनास आली. याची तत्काळ दखल घेत, आम्ही महामेट्रोच्या देखभाल आणि तांत्रिक पथकामार्फत काम सुरू केले असून, गळतीचे नेमके कारण शोधले जात आहे. तांत्रिक त्रुटी किंवा उणिवा आढळल्यास त्या त्वरित दुरुस्त करण्याची प्रक्रिया राबविली जात आहे.
चंद्रशेखर तांबवेकर, अतिरिक्त महाव्यवस्थापक, महामेट्रो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT