ऊस लागवडीसाठी शेतकर्‍यांची लगबग Pudhari
पुणे

Sugarcane Cultivation: ऊस लागवडीसाठी शेतकर्‍यांची लगबग

चालू वर्षी तालुक्यात ऊस लागवडीखालील क्षेत्रात वाढ होण्याची चिन्ह दिसत आहे.

पुढारी वृत्तसेवा

Farmers busy with sugarcane cultivation

बावडा: ऊस हे हमीभाव देणारे एकमेव पीक आहे. त्यामुळे ऊस पीक घेण्याकडे शेतकर्‍यांचा ओढा कायम आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने सध्या ऊस लागवडीसाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू असल्याचे चित्र इंदापूर तालुक्यात पाहवयास मिळत आहे. दरम्यान, चालू वर्षी तालुक्यात ऊस लागवडीखालील क्षेत्रात वाढ होण्याची चिन्ह दिसत आहे.

सध्या एक एकर ऊस लागणीसाठी साधारणत: सात ते आठ हजार रुपये मजुरी खर्च येत आहे. तर ऊस बेणेचा दर एका गुंठ्यासाठी सुमारे 6 हजार रुपये एवढा आहे. इंदापूर तालुका हा ऊस पिकाचे आगार समजला जात आहे. (Latest Pune News)

तालुक्यातील बागायती क्षेत्र जास्त असलेने साहजिकच उसाचे क्षेत्रही मोठे आहे. तालुक्यात कर्मयोगी शंकररावजी पाटील, निरा भीमा, छत्रपती, बारामती अ‍ॅग्रो असे चार साखर कारखाने ऊसाचे गाळप करतात.

उसाच्या दराबाबत इतर पिकांप्रमाणे चढ-उतार, तसेच हवामान बदलाचा फारसा मोठा परिणाम होत नाही. त्यामुळे ऊस पीक हे तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये सर्वाधिक पसंती देणारे पीकठरलेले आहे. सध्या ऊस लागवडीसाठी शेतकर्‍यांची को. 86032 व फुले 265 या वाणांना पसंती असल्याची माहिती गौरव माने (निरनिमगाव), नवनाथ पवार (बावडा), विजय घोगरे (सुरवड), सागर सवासे (बोराटवाडी) या ऊस उत्पादकांनी दिली.

सध्या बेण्यासाठी ऊस तोडणे, त्याची वाहतूक करणे, सरी सोडणे, बेणे दाबणे आदी कामे सुरू असल्याचे चित्र रस्त्यावरून ये-जा करताना दिसून येत आहे.

एकंदरीत, इंदापूर तालुक्यात आजअखेर सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. त्यामुळे आगामी किमान 2 ते 3 वर्षे ऊस पिकासाठी लाभदायक ठरणार आहेत, असे नीरा-भीमा कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे व संचालक राजेंद्र देवकर (रेडा) यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT