Garbage Issue: पुरंदरच्या घाटमार्ग परिसरातील सौंदर्य धोक्यात; शहरातील कचरा, चिकन दुकानांतील टाकाऊ मांसामुळे दुर्गंधी

परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
Garbage Issue
पुरंदरच्या घाटमार्ग परिसरातील सौंदर्य धोक्यात; शहरातील कचरा, चिकन दुकानांतील टाकाऊ मांसामुळे दुर्गंधीPudhari
Published on
Updated on

Purandar ghat beauty at risk due to city waste

सासवड: पुरंदर तालुक्याच्या सीमेवर बहुतेक सर्वच बाजूस विविध नैसर्गिक घाटमार्ग आहेत. त्या घाटमार्गाच्या परिसरात स्थानिक व शहरी नागरिकांनी ठिकठिकाणी कचरा आणि चिकनच्या दुकानातील मृत कोंबड्या व टाकाऊ अवयव टाकल्या जातात. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

टेकवडी (ता. पुरंदर) गाव ऑक्सिजन व्हिलेज अशी ओळख निर्माण करतेय. मात्र, येथील घाटात शासनाची जागा कचरा डेपो होत आहे. ताम्हणवाडी घाटाच्या टेकवडी गावच्या दर्शनी भागात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी वाढत आहे. तसेच, कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झालेली आहे. (Latest Pune News)

Garbage Issue
Panshet Dam: पानशेत धरण पूर्ण क्षमतेने भरले; ‘खडकवासला’तून मुठा नदीत पुन्हा विसर्ग

याचा ठिकाणी चिकन दुकानातील मृत कोंबड्या व त्यांचे टाकाऊ भागासह हॉटेल किंवा औद्योगिक वसाहतीमधील कॅन्टीनचे शिल्लक अन्न उघड्यावर टाकले जाते. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याचे टेकवडीचे माजी उपसरपंच सूरज गदादे यांनी सांगितले.

टेकवडी ताम्हणवाडी घाटमाथ्यावर विविध टाकाऊ फर्निचर, तुटक्या वस्तू, खराब गाद्या, उशा, थर्माकॉल, बाटल्या, पत्रावळी, प्लॅस्टिक मटेरियल, राडारोडा टाकण्यात आला आहे. त्यामुळे बहुतेक घाटमार्गालगतच्या पर्यावरणाला हानी पोहचत आहे. तालुक्याकडील ताम्हणवाडी घाटमार्ग सोलापूर महामार्गाकडे उरुळी कांचनला जाण्यास उपयोगी पडतो. हा घाटमार्गही कचर्‍याच्या कचाट्यातून सुटला नाही.

Garbage Issue
Aandekar gang: आंदेकर टोळीला पिस्तुले पुरविल्याचा संशय; गुंड टिपू पठाण टोळीतील पंटरला बेड्या

पुरंदरमधील सर्वच घाटांमध्ये नैसर्गिक व स्वच्छ वातावरण या कचर्‍याने बिघडवून टाकले आहे. तालुक्यात कोणत्याही घाटमार्गाने येताना हा दुर्गंधीयुक्त कचरा स्वागत करतो. परिणामी पर्यावरणाची मोठी हानी होऊन मानवी आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा लोकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ रोहन खांडगे, माचिंद्र झिंजुरके, युवराज इंदलकर, विशाल वलटे, दिपक वलटे, संकेत खांडगे, तुषार इटकर, सोमनाथ इंदलकर, सागर खांडगे, सोमनाथ गदादे, केतन इंदलकर आदींनी केली आहे.

पुरंदरच्या पवित्र समजल्या जाणार्‍या खिंडीत अस्वच्छता वाढली आहे. ज्या भागातून टेकवडी, ताम्हणवाडी घाटमाथ्यावर या गाड्या येतात, त्या उरुळी कांचन, बोरी-ऐंदी, ताम्हणवाडी मार्गावरील सगळे सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी करावी. त्यातूनच गाडी नंबर मिळून संबंधितांवर कारवाई करणे सोपे जाणार आहे.

- सूरज गदादे, माजी उपसरपंच, टेकवडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news