Sugar  Pudhari
पुणे

Pune Sugar Prices: साखरेच्या दरात पुन्हा तेजी; पुण्यात क्विंटलमागे ५० रुपयांची वाढ

मान्सून अद्याप सक्रिय नसल्याने थंडपेय उद्योगाकडून मागणी कायम; साखरेचे दर आणखी वाढण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पुणे: केंद्र सरकारने चालू महिन्यासाठी २२.५० लाख टन साखरेचा कोटा जाहीर केला असला तरी मॉन्सून सक्रीय न झाल्याने उन्हाचा चटका कायम आहे. त्यामुळे, थंडपेय, सरबत आदींच्या निर्मितीसाठी साखरेची मागणी कायम आहे. परिणामी, पुरवठा अपुरा पडत असून गेल्या आठवड्यात साखरेच्या दरात क्विंटलमागे सुमारे ५० रुपयांची वाढ झाली आहे. बाजारातील परिस्थिती पाहता येत्या काही दिवसांत साखरेच्या दरात आणखी ५० रुपयांची वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

मार्केट यार्डातील भुसार विभागात मागील दोन महिन्यापासून मंदी आहे. कोणत्याही मालाला अपेक्षित उठाव नाही. त्यामुळे साखर वगळता सर्व वस्तुंचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. ऊन्हाळी सुट्टी संपल्यानंतर मार्केट यार्डातील गुळ-भुसार विभागात वस्तुंना मागणी वाढण्याचा अंदाज होता. मात्र, अद्याप मागणी वाढलेली नाही. त्यातच सध्या कोणताही सण-उत्सव नसल्यामुळे गिऱ्हाईकाने खरेदीकडे पाठ फिरवलेली आहे. डिझेल दरवाढीचा परिणाम अद्याप कोणत्याही मालावर झालेला नाही. मात्र, येत्या काळात तो परिणाम जाणवू लागण्याची शक्यता आहे. अन्न औषध प्रशासनाने कारवाई सुरू केल्यामुळे दौंड, केडगाव आणि सांगली भागातील अनेक गुऱ्हाळे बंद झाली आहेत. त्यामुळे दररोज ८० टन होणारी गुळाची आवक आता २० टन होत आहे. आवक घटली असली तरीही भाव मात्र कायम आहेत. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे शेंगदाणा, साबुदाणा, भगर, सर्व प्रकारच्या डाळी, अन्नधान्य, खाद्यतेल, बेसन आणि नारळाचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

बाजारभाव पुढीलप्रमाणे :

साखर (प्रतिक्विंटल) ४२००-४२५० रु. खाद्यतेले (१५किलो/लिटर) :- शेंगदाणा तेल २६५०-२९००, रिफाईंड तेल २३००-३१००, सरकी तेल २१५०-२६००, सोयाबीन तेल २१५०-२६००, पामतेल २१५०-२४५०, सूर्यफूल रिफाईंड तेल २३५०-२५००, खोबरेल तेल ४०००, वनस्पती २०५०-२५५० रु. तांदूळ:- गुजरात उकडा ३६५०-४२००, मसुरी ३१००-३५००, सोना मसूरी ४४००-७४००, एच.एम.टी. कोलम ५७००-६०००, लचकारी कोलम ६६००-७१००, चिन्नौर ६५००-७०००, ११२१-११५००-१२५००, आंबेमोहोर (सुवासिक) १४५००-१६५००, बासमती अखंड १२५००-१४५००, बासमती दुबार १००००-१०५००, बासमती तिबार १०५००-११०००, बासमती मोगरा ६०००-६५००, बासमती कणी ४५००-५०००, १५०९-१०००-११०००, इंद्रायणी ६००० रु. गहू - लोकवन नं. १ ४१५०-४४००, लोकवन नं. २ ३७००-३९००, नं.३ ३०७५-३६५०, सिहोर नं. १ ५९००-६५००, सिहोरी ३८५०-४४५०, मिलबर २९००-२९५० रु.

ज्वारी :- गावरान नं. १ ५७००-६५००, गावरान नं.२ ५२००-५५००, नं.३ ४७००-५१००, दूरी नं.१ ३८००-४०००, दूरी नं. २ ३५००-३७०० रु बाजरी:- महिको नं.१ ३४००-३७००, महिको नं.२ ३१००-३३००, गावरान ३०००-३२००, हायब्रीड २८५०-३०००रु. गूळ :- गूळ नं. १ ४६००-४७५०, गूळ नं.२ ४४५०-४५५० गूळ नं.३ ४३००-४४००, बॉक्स ४५००-५५०० रु. डाळी:- तूरडाळ १००००-१२५००, हरभराडाळ ७३००-७५००, मूगडाळ ९०००-१००००, मसूरडाळ ७५००-७६००, मटकीडाळ ८२००-८३००, उडीदडाळ १००००-१२००० रु. कडधान्ये:-हरभरा ७१००-७५००, हुलगा ६६००-७२००, चवळी ७८००-९८००, मसूर ७५००-८२००, मूग ९२००-१२०००, मटकी गावरान १५०००-१६७००, मटकी पॉलिश ८७००, मटकी गुजरात १६५००-१७५००, मटकी राजस्थान ७५००-८०००, मटकी सेलम १७५००-१८५००, वाटाणा हिरवा ५५००-५५००, वाटाणा पांढरा ५०००-५२००, काबुली चणा ७४००-१०८०० रु. साबुदाणा :-साबुदाणा नं.१ ७०००, साबुदाणा नं.२ ६५००, साबुदाणा नं.३ ६२०० रु. वरई भगर :-२००००-२१०००, सावा भगर १९०००-२०००० रु. गोटा खोबरे ३७०००-३९००० रु. शेंगदाणा :- जाडा ११०००-१२५००, स्पॅनिश–१२३००-१३८००, घुंगरु ११२००-१२७०० धने :- गावरान १२०००-१३०००, इंदूर १५०००-१७००० इंदुर सुपर २५०००-३०००० रु.

पोहे :- मध्य प्रदेश ४६००-४९००, पेण ४६००-४८००, मध्यम पोहा ४६००-४८००, दगडी पोहा ४८००-५१००, पातळ पोहा ५२००-५८००, सुपर पोहा ५२००-५८००, भाजका पोहा ६५०-७५०, मका पोहा ५५०-६५०, भाजके डाळे ३२००-३८००, मुरमुरा सुरती (९किलोस) ५६०, भडंग ८५०-११००, घोटी ५४० रु. रवा, मैदा, आटा- (५० किलोचा भाव) आटा १६००-१६५०, रवा १६५०-१७५०, मैदा १६५०-१७५०, बेसन:- (५० किलोस) ३९००-४६५० रु. मिरची: काश्मीरी ढब्बी ६००००-६५०००, ब्याडगी ३५०००-५००००, लवंगी तेजा २३०००-२५०००, गुंटूर २४०००-२६०००, खुडवा गुंटूर १२०००-१३०००, खुडवा ब्याडगी १६०००-१८००० रु. नारळ :- (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग १७००-१८५०, मद्रास ४६००-४८००, पालकोल जुना २१००-२३००, सापसोल ३५००-५००० रु.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT