मागणीअभावी साखर, नारळ आणि शेंगदाण्याचे दर घसरले Pudhari File Photo
पुणे

Sugar Price Fall: मागणीअभावी साखर, नारळ आणि शेंगदाण्याचे दर घसरले

घाऊक बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी; हिरवा-पांढरा वाटाणा मात्र चढत्या भावात

पुढारी वृत्तसेवा

सुभाष किवडे

पुणे : मागणी कमी असल्याने गेल्या आठवड्यात साखरेच्या दरात क्विंटलमागे पन्नास रुपयांनी घट झाली. नारळाचे दरही शेकड्यामागे दोनशे रुपयांनी कमी झाले. आवक वाढल्यामुळे शेंगदाण्याचे दरही दोनशे रुपयांनी उतरले. मात्र आवक कमी असल्यामुळे हिरव्या तसेच पांढऱ्या वाटाण्याच्या दरात वाढ झाल्याचे येथील घाऊक बाजारातून सांगण्यात आले. घाऊक बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी असून उलाढाल मर्यादित प्रमाणात होत असून यामुळे दरातील वध-घट देखील मर्यादित प्रमाणात झाल्याचे सांगण्यात आले.(Latest Pune News)

चालू महिन्याकरिता जाहीर झालेला वीस लाख टनाचा कोटा तुलनेने कमी आहे. मात्र मागणीच नसल्याने दरवाढ होण्याऐवजी मंदीकडे झुकले आहेत. गेल्या आठवड्यात दरात क्विंटलमागे पन्नास रुपयांनी घट झाली. शनिवारी येथील घाऊक

बाजारात एस 30 साखरेचा प्रतिक्विंटलचा दर 4 हजार 150 ते 4 हजार 200 रुपये होता. गुळाचा नवीन हंगाम सुरू झाला असून बाजारात नव्या गुळाची आवक सुरू झाली आहे. मात्र, गूळ तयार करण्याकरिता लागणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने उत्पादन मंदावले आहे. यामुळे आवक अपेक्षित प्रमाणात वाढलेली नाही. सध्या कोणतेही सण-उत्सव नसल्याने मागणीही साधारणच आहे. आवक-जावक साधारण असल्यामुळे गेल्या आठवड्यात सर्व प्रकारच्या गुळाचे दर स्थिर होते.

नवा नारळ, शेंगदाण्याचे दर उतरले

मागणी कमी असल्याने गेल्या आठवड्यात नव्या तसेच मद्रास नारळाच्या दरात शेकड्यामागे दोनशे रुपयांनी घट झाली. भूईमुग शेंगेची आवक सुरू झाल्याने शेंगदाण्याचे दर मंदीकडे झुकले आहेत. गेल्या आठवड्यात दरात क्विंटलमागे दोनशे रुपयांनी घट झाली.

येथील घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे : साखर (प्रतिक्विंटल) 4100-4150 रु. खाद्यतेले (15किलो/लिटर):- शेंगदाणा तेल 2375-2475, रिफाईंड तेल 2150-2750, सरकी तेल 2075-2375, सोयाबीन तेल 1900-2125, पामतेल 1875-2075, सूर्यफूल रिफाईंड तेल 2075-2250, खोबरेल तेल 6000 वनस्पती 1830-2080 रुपये. तांदूळ :- गुजरात उकडा 3500-4000, मसुरी 3500-4000, सोना मसूरी 4500-5000, एच.एम.टी. कोलम 5500-6500, लचकारी कोलम 6500-7000, चिन्नोर 4500-5000, 1121-11000-11500, आंबेमोहोर (सुवासिक) 20000, बासमती अखंड 12000-13000, बासमती दुबार 9500-1000, बासमती तिबार 10000-10500, बासमती मोगरा 5500-6500, बासमती कणी 4000-4500, 1509-8500-9500, इंद्रायणी 5500-6000 रु. गहू - लोकवन नं. 1 4000-4200, लोकवन नं. 2 3600-40020,

नं.3 3300-3600, सिहोर नं. 1 5700-6000, सिहोरी 3800-4400, मिलबर 3100 रु. ज्वारी :- गावरान नं. 1 5500-5800, गावरान नं.2 4800-5000, नं.3 3500-3800, दूरी नं.1 3600-4000, दूरी नं. 2 3200-3500 रु बाजरी:- महिको नं.1 3700-3800, महिको नं.2 3300-3500, गावरान 3500-3600, हायब्रीड 3200-3300 रु. गूळ :- गूळ नं. 1 4500-4650, गूळ नं.2 4325-4450 गूळ नं.3 4175-4300, बॉक्स पॅकिंग 4200-5200 रु. डाळी:- तूरडाळ 9500-11000, हरभराडाळ 7100-7200, मूगडाळ 9700-9700, मसूरडाळ 7400-7500, मटकीडाळ 8300-8400, उडीदडाळ 10000-10400 रु. कडधान्ये:-हरभरा 6500-6600, हुलगा 4800-5000 चवळी 7000-9500, मसूर 6900-7000, मूग 9000-9200, मटकी गावरान 12000, मटकी पॉलिश 6800-7000, मटकी गुजरात 6800-7000, मटकी राजस्थान 6800-7000, मटकी सेलम 15000-15000, वाटाणा हिरवा 13000-14000, वाटाणा पांढरा 4400-4500, काबुली चणा 7500-11000 रु. शेंगदाणा :- जाडा 8100-9600, स्पॅनिश9800-10000, घुंगरु 8800-9000 टीजे 8000 रु. नारळ :- (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग 2600-2800, मद्रास 4700-5000, पालकोल जुना 3100-3200, सापसोल 4500-5300 रु.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT