Sub Registrar Pudhari
पुणे

Pune Sub Registrar Vacant: पुण्यात दुय्यम निबंधकांची पदे रिक्त

अनेक कार्यालयांत सबरजिस्ट्रार नसल्याने मालमत्ता दस्तनोंदणीची प्रक्रिया संथ; नागरिकांना चकरा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये सबरजिस्ट्रारची पदे रिक्त असल्याने दस्तनोंदणीचे कामकाज रखडले आहे. अनेक कार्यालयांमध्ये कायमस्वरूपी सबरजिस्ट्रार नसल्यामुळे बदली किंवा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांवरच कारभार चालत आहे. परिणामी मालमत्ता व्यवहारांच्या नोंदणीसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शहरात एकूण 27 दुय्यम निबंधक कार्यालये कार्यरत आहेत. मात्र, त्यांपैकी आठ ते दहा कार्यालयांत सबरजिस्ट्रार नसल्याचे वास्तव समोर आले आहे. या ठिकाणी बदली अधिकारी किंवा अतिरिक्त कार्यभारावर काम चालवले जात असल्याने दस्तनोंदणीची प्रक्रिया संथगतीने होत आहे.

दस्तनोंदणी ही जबाबदारीची आणि तांत्रिक प्रक्रिया असल्याने बदलीवर आलेले कर्मचारी अनेकदा निर्णय घेण्यास किंवा दस्तनोंदणी करण्यास धजावत नसल्याचीही माहिती पुढे आले आहे. त्यामुळे अनेक व्यवहार प्रलंबित राहत असून, नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. दरम्यान, शहरात मोठ्या प्रमाणावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असताना दुय्यम निबंधकपदे रिक्त राहणे ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT