विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गेटवर चढून आत घुसण्याचा प्रयत्न केला.  (Pudhari Photo)
पुणे

Savitribai Phule Pune University: पुण्यात विद्यार्थी आक्रमक, ग्रेस मार्कांवरून वाद, विद्यापीठाच्या गेटवर चढून आत घुसले

Pune News | विद्यार्थ्यांच्या मागणीवर विचार करण्यासाठी विद्यापीठाकडून दोन दिवसांची वेळ मागितली

पुढारी वृत्तसेवा

Pune News University  Student Protest 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांनी आज (दि.१४) धडक मोर्चा काढण्यात आला. ग्रेस गुण मिळत नसल्याचा या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. आम्हाला मार्क मिळाले नाही. तर आम्ही येथून उठणार नसल्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली आहे आंदोलनावेळी विद्यार्थी आक्रमक होऊन गेट तोडून आत आल्याने पोलीस खबरदारी घेत आहेत. तर विद्यापीठाकडून दोन दिवस चर्चेसाठी वेळ मागण्यात आला आहे. मात्र विद्यार्थी आक्रमक झाले असून आम्ही डिप्रेशनमध्ये जात असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी पुरवणी परीक्षा, कॅरी ऑन लागू करण्यात यावा, यासाठी निवेदन देण्यासाठी गेले असता पुणे विद्यापीठ विद्यार्थ्यांना गेट लावून अडवणूक करत असल्याने विद्यार्थी काँग्रेस (NSUI) तर्फे गेट वर चढून आंदोलन करण्यात आले. व संबंधित विद्यापीठ प्रशासनाला खाली बोलावून विद्यार्थ्यांचे मागणी व निवेदन देण्यात आले. यावेळी विद्यार्थींच्या मागणी बाबत सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT