पुणे

निकषात असूनही आरक्षण मिळत नसल्याने ताकदीने लढा : मनोज जरांगे-पाटील

अमृता चौगुले

सांगवी : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाची दोन अंगे आहेत. मराठा क्षत्रिय असून, त्याला लढायचं कसं ते माहीत आहे. शेती करून तो देशाला अन्न पुरवतो.आज मराठा समाज राज्यात सर्वत्र असून, त्याचे रक्ताचे नाते आहे. मराठा समाजाला निकषात बसूनही आरक्षण मिळत नाही. त्यामुळे आरक्षणाचा हा लढा ताकदीने लढायचा आहे,असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.

शुक्रवारी ( दि.20 ) बारामती येथील सभा संपल्यानंतर मनोज जरांगे-पाटील हे फलटणला जाताना सांगवी (ता.बारामती) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रात्री जंगी स्वागत केले. त्या वेळी जमलेल्या हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित करताना वरील इशारा त्यांनी दिला. जरांगे-पाटील म्हणाले की, मराठा आणि कुणबी एक आहेत, त्यांनी कधी जात पाहिली नाही.राज्यातील पक्ष आणि नेतेही मोठे केले.आता नाही तर मराठा समाजाला आरक्षणाची पुन्हा संधी नाही. याच संधीचे सोने करू या. समाजात फूट पडू न देता आरक्षणाचे पुण्य पदरात पाडून घेऊ. अनेक पिढ्यांची खदखद बाहेर पडली आहे.त्यामुळे शांततेत हे आंदोलन करू.

तावरेंचा इतिहास माहीत आहे !

मनोज जरांगे-पाटील हे बोलत असताना, हे गाव कोणतं आहे, या गावात कोणत्या आडनावाची लोकं जास्त आहेत. त्यावर तावरे आडनाव सांगताच, त्यांनी बारामतीत तावरे आडनावाचा इतिहास चांगलाच माहीत असल्याचा उल्लेख करताच उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांचा एकच कडकडाट केला.

हेही नाचा

SCROLL FOR NEXT