पुणे

देहूगाव : धोकादायक होर्डिंग्जवर कठोर कारवाई होणार

अमृता चौगुले

देहूगाव : येलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील 5 ते 6 होर्डिंग्ज अतिशय धोकादायक असल्याचे वृत्त दैनिक 'पुढारी'मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर या वृताची दखल घेत येलवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका यांनी तातडीने सर्वे करून संबंधित होर्डिंगधारकांना नोटीस बजावल्या आहेत. तसेच, ते होर्डिंग अधिकृत आहेत की नाही आणि याचे स्ट्रक्चर ऑडिट केले आहे का, याची माहिती मागवली होती.

परंतु, संबंधितांनी पाच दिवसांत कागदपत्रांची पूर्तता केली नसल्यामुळे अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात येणार आहे. येलवाडी हद्दीत धोकादायक असलेल्या अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याबाबतचा ठराव 30 मे रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत सर्वानुमते सहमत करण्यात आला होता. त्याप्रमाणे सर्व अनधिकृत असलेल्या मालकांना होर्डिंग काढण्यासाठी नोटीस देण्यात आल्या आहेत. तसेच, याचे वेळेत समाधानकारक उत्तर न दिल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

पाच दिवसांत होर्डिंगधारकांना होर्डिंग स्वत:हून काढले नाहीत, तर ते पोलिस बंदोबस्तात क्रेन, जेसीबीच्या साह्याने काढण्याची कारवाई करण्यात येईल आणि त्या होर्डिंगचे सर्व साहित्य जप्त करण्यात येतील.

– रणजीत गाडे, सरपंच, येलवाडी ग्रामपंचायत

पालखी प्रस्थान सोहळा तोंडावर आला आहे. अनेक वारकरी, भाविकभक्त या साई चौकातून मंदिराकडे जात असतात. त्यांच्या जीविताला धोका निर्माण हाऊ नये, यासाठी या भागातील होर्डिंग काढणे आवश्यक आहे.

– सुरेशमहाराज मोरे, संत तुकाराम महाराजांचे वंशज

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT