पुणे

एसटीच्या अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

अमृता चौगुले
कामशेत(पुणे) : कामशेतमध्ये येणार्‍या शालेय व कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे एसटीच्या अनियमित वेळेमुळे हाल होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.  विशेषत: नाणेसाई परिसरातून येणार्या विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. सकाळी आठ वाजता कॉलेज असते. परंतु,  आठ वाजता एसटी येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये पोहोचण्यास उशीर होत आहे. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थी एसटीने प्रवास करण्याचे टाळतात.

खासगी वाहनांना  विद्यार्थ्यांची पसंती

एसटी वेळेवर येत नसल्यामुळे खासगी वाहनांनी विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागते. याविषयी विद्यार्थ्यांनी सांगितले, की एसटीचा पास काढला आहे. परंतु, एसटी वेळेवर येत नसल्याने शाळेत वेळेवर पोहोचता येत नाही. त्यामुळे पास वाया जात आहे. तसेच, अनेकवेळा
खासगी वाहनांनी शाळेत जावे  लागत असल्यामुळे एसटी महामंडळाने शाळेच्या वेळापत्रकानुसार बस सोडणे गरजेचे आहे.
साई वाउंड एसटी बस सुरू केली होती; परंतु अनेक ग्रामस्थांनी एसटी सोडण्याच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली होती. त्यामुळे ग्रामपंचायतीने ग्रामसभेत कोणत्या वेळेत बस सोडायची याबाबत ठराव करावा आणि त्याची एक प्रत प्रशासनाला द्यावी. त्यानुसार प्रशासनाला एसटी बस सोडण्याची वेळ ठरवता येईल.
– प्रमोद धायतोंडे, व्यवस्थापक एसटी महामंडळ तळेगाव 
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT