पीआरएन ब्लॉक विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची File Photo
पुणे

SPPU PRN Block Students Exam: पीआरएन ब्लॉक विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नॉन एनईपी पॅटर्नच्या विद्यार्थ्यांना एनईपी पॅटर्नमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कोणत्या विद्यार्थ्यांना नियमानुसार परीक्षेची संधी उपलब्ध करून देता येणार आहे. सत्र पूर्ततेचा नियत कालावधी आणि अंतर्गत मूल्यमापनाबाबतची खात्री करूनच पीआरएन ब्लॉक असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा स्वतंत्रपणे वेळापत्रक जाहीर करून आयोजित करण्यात येणार आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे प्र. संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.(Latest Pune News)

विद्यापीठाच्या अधिकार मंडळांकडून ज्या विद्यार्थ्यांची सत्र पूर्तता (N+2) संपुष्टात आली आहे किंवा कायम नोंदणी क्रमांक कालावधी संपुष्टात आला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना सध्या सुरू असलेला छजछ- छएझ पॅटर्न अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिकचे एक वर्ष (N+2+1)देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच काही अभ्यासक्रमातील (N+2)आणि (N+2+1) व्यतिरिक्त अधिकचा सत्र पूर्तता कालावधी असलेल्या विद्यार्थ्यांनाही सध्या सुरू असलेल्या NON-NEP पॅटर्नमध्ये अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षास प्रवेशित/प्रविष्ट होऊन असे NON-NEP अभ्यासक्रम पूर्ण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सर्व विद्याशाखा, सर्व अभ्यासक्रमांतील कालावधी संपुष्टात आलेल्या अशा विद्यार्थ्यांची माहिती विद्यापीठाच्या डेटाबेसमधून वर्गीकृत करण्यात येत असून यासंदर्भातील कार्यप्रणाली निश्चित करण्याचे काम सुरू आहे.

विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयाअंतर्गत समाविष्ट सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज स्वतंत्रपणे सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे याबाबत विद्यार्थ्यांनी साशंक अथवा भयभीत होऊ नये. याअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील सत्र पूर्तता, शेवटचे वर्ष त्यांच्या मूळ महाविद्यालयातून पूर्ण करण्याची आवश्यकता, विविध अभ्यासक्रमात वेळोवेळी समाविष्ट झालेला मूळ कालावधी या सर्वांची छाननीही होणार आहे.

याबाबतची प्रणालीही तयार करण्याचे काम सुरू आहे. त्या अनुषंगाने यासंदर्भात सर्व संबंधितांना कळविण्यात येत आहे की, सत्र पूर्ततेचा नियत कालावधी आणि अंतर्गत मूल्यमापनाबाबतची खात्री करूनच अशा सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ही स्वतंत्रपणे वेळापत्रक जाहीर करून आयोजित करण्यात येईल. या सर्व पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थी, पालक यांना निर्देशित करण्यात येते की, उपरोक्त बाबींसंदर्भात आपण आपल्या मूळ महाविद्यालयाचे परिसंस्थेचे प्राचार्य, संचालक आणि परीक्षा अधिकारी यांच्या संपर्कात राहावे. शिवाय विद्यापीठाच्या अधिकृत परिपत्रकाशिवाय इतर अफवा अथवा माहिती यांना अजिबात बळी पडू नये. सत्र पूर्तता किंवा पीआरएनसंदर्भातील सर्व माहिती ही केवळ विद्यापीठाकडे असलेल्या स्वतःच्या डेटाबेसमधूनच घेतली जाणार असून यासाठी विद्यापीठाने कोणत्याही व्यक्तीला, व्यक्ती समूहांना नियुक्त केले नाही, याचीही विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असेही देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT