SPPU File Photo
पुणे

SPPU UPSC MPSC Free Coaching: पुणे विद्यापीठाच्या मोफत UPSC-MPSC प्रशिक्षण प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर

२२ फेब्रुवारी २०२६ रोजी परीक्षा; १७ फेब्रुवारीपासून प्रवेशपत्र उपलब्ध

पुढारी वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीच्या मोफत यूपीएससी-एमपीएससी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही प्रवेश परीक्षा रविवार, 22 फेबुवारी 2026 रोजी घेण्यात येणार असून, परीक्षा फक्त पुणे शहरात आयोजित करण्यात येणार आहे.

हा प्रशिक्षण कार्यक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाअंतर्गत राबविण्यात येत असून, गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन मिळणार आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र (हॉल तिकीट) दिनांक 17 फेबुवारी 2026 पासून विद्यापीठाच्या http:/// campus.unipune.ac. in/ ccep/ login. aspx या संकेतस्थळावरून डाउनलोड करावे. परीक्षेचे ठिकाण व वेळ याबाबतची संपूर्ण माहिती

प्रवेशपत्रावर नमूद करण्यात येणार आहे. पुणे शहराबाहेरील उमेदवारांनी वाहतूक व इतर अडचणी लक्षात घेता परीक्षेच्या एक दिवस आधी पुण्यात येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करताना कोणतीही अडचण आल्यास उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत spsupport@pun. unipune.ac.in या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. ही योजना विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी ठरणार असून, ग््राामीण व वंचित घटकातील तरुणांना यूपीएससी व एमपीएससी परीक्षांसाठी गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT