पुणे: पुण्यातील गणेशोत्सवाला वैभवशाली परंपरा आहे. इथल्या गणेश मंडळांसमोरील देखावे भक्तांसाठी खास आकर्षण असते. पुणे जिल्ह्यातील अनेक भागांतून गणेशभक्त देखावे पाहण्यासाठी येतात. गणेशोत्सवाच्या धामधुमीत मेट्रो गणेशभक्तांसाठी मोठा आधार बनली आहे. पिंपरी-चिंचवडसह अनेक भागांतून नागरिक पुणे शहरातील मध्यवस्ती भागात मेट्रोने येऊन देखावे पाहण्याचा आनंद लुटत आहेत.पुणे : पुढारी वृत्तसेवा
पुण्यातील गणेशोत्सवाला वैभवशाली परंपरा आहे. इथल्या गणेश मंडळांसमोरील देखावे भक्तांसाठी खास आकर्षण असते. पुणे जिल्ह्यातील अनेक भागांतून गणेशभक्त देखावे पाहण्यासाठी येतात. गणेशोत्सवाच्या धामधुमीत मेट्रो गणेशभक्तांसाठी मोठा आधार बनली आहे. पिंपरी-चिंचवडसह अनेक भागांतून नागरिक पुणे शहरातील मध्यवस्ती भागात मेट्रोने येऊन देखावे पाहण्याचा आनंद लुटत आहेत.
कसबा पेठेत उतरा, परतीचा प्रवास मंडई मेट्रो स्थानकातून करा
गणेशोत्सवाच्या काळात मध्यवस्तीतील वाढती गर्दी लक्षात घेत मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना गर्दी नियंत्रणासाठी आवाहन केले आहे. पिंपरी भागातून मेट्रोने (पर्पल लाइन) येणार्या प्रवाशांनी कसबा पेठ मेट्रो स्थानकात उतरावे अन् परतीचा प्रवास मंडई मेट्रो स्टेशनवरून करावा. याशिवाय वनाज-रामवाडी (अॅक्वा लाइन) मार्गिकेवरून मेट्रोने येणार्या प्रवाशांनी पीएमसी (महापालिका) स्थानकावर उतरावे, असे आवाहन केले आहे.
यापूर्वी गणेशोत्सवात मंडईमध्ये जाणे म्हणजे एक मोठे आव्हान असायचे. पण, आता मेट्रोमुळे प्रवास खूप सोयीचा झाला आहे. थेट मेट्रो स्टेशनवर उतरून दर्शनाला जाता येते आणि वेळेचीही बचत होते.- शुभांगी देशमुख, दापोडी
गणेशोत्सवामुळे मध्यवस्तीत जाणारे प्रवासी मेट्रोचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत. त्यांच्या सोयीसाठी आणि अतिरिक्त गर्दीनियंत्रणासाठी मेटोनेही नियोजन केले आहे. प्रवाशांनीही मेट्रोच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.- डॉ. हेमंत सोनवणे, महाव्यवस्थापक तथा कार्यकारी संचालक, महामेट्रो