नवी दिल्ली : धनत्रयोदशीच्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घट झाली. सोने दहा ग्रॅममागे १,९१० रुपयांनी आणि चांदीच्या भावात एका किलो मागे तब्बल १३ हजार रुपयांनी घट झाली आहे. (Latest Pune News)
सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव १,९१० रुपयांनी घटून १ लाख ३० हजार ८६० रुपयांवर आला आहे. तर, २२ कॅरेट सोन्याचा भाव १,७५० रुपयांनी घटून १ लाख १९ हजार ९५० रुपयांवर आला आहे. चांदीचा भाव १ लाख ८५ वरून १ लाख ७२ हजार रुपयांवर घसरला आहे. चांगल्या दराचा फायदा घेण्यासाठी सटोडियांनी विक्री केल्याने दरात काहीशी घसरण पाहायला मिळत आहे.
असे आहेत शहरातील दर....
धनत्रयोदशीनिमित्त सोने आणि चांदीची नाणी, लक्ष्मी आणि गणेशाची प्रतिमा, वेढणी यांना चांगली मागणी आहे. वस्तू आणि सेवा करासह (जीएसटी) २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव १ लाख ३२ हजार रुपये असून, २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख २२ हजार ५७० रुपये आहे. चांदीचा प्रतिकिलो भाव १ लाख ७८ हजार रुपये असल्याची माहिती पुण्यातील सराफा व्यावसायिक वस्तूपाल रांका यांनी दिली.