Shri Morya Gosavi Festival organized from Tuesday 
पुणे

श्री मोरया गोसावी महोत्सवाचे मंगळवारपासून आयोजन

backup backup

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाची सुरुवात 21 ते 25 डिसेंबर 2021 या कालावधीत होणार आहे. या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने विविध उपक्रम होणार आहेत.

सोहळ्याचे यंदाचे 460 वे वर्ष आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा महोत्सव होणार असल्याची माहिती मुख्य विश्वस्त मंदार देव यांनी शुक्रवारी (दि. 17) चिंचवड येथे पत्रकार परिषदेत दिली.

विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन

कोल्हापूर करवीरपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विद्या नृसिंह स्वामी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पाच दिवस श्री मोरया गोसावी चरित्रपठण, सूक्त पठण होईल.

भजन, कीर्तन, सुगम संगीत, सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, श्री मोरया गोसावी चरित्र पठण, सामुदायिक महाभिषेक, रक्तदान शिबिर, याग, श्रीसूक्तपठण, दंत आणि नेत्र चिकित्सा शिबिर, माफक दरात चष्मे वाटप असे विविध कार्यक्रम होणार असल्याचे या वेळी सांगितले.

या वेळी विश्वस्त विश्राम देव, हभप आनंद तांबे, अ‍ॅड. राजेंद्र उमाप, विनोद पवार, महेश पाटसकर, अतुल भंडारे आदी उपस्थित होते.
22 डिसेंबर सायंकाळी साडेचार वाजता आहार तज्ज्ञ डॉ. जग्गनाथ दीक्षित यांचे व्याख्यान तर रात्री आठ वाजता वैशाली माडे आणि त्यांच्या सहकलाकारांचे सुगमसंगीत होईल.

दुसर्‍या दिवशी सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांचे 'हिंदवी स्वराज्याचे धार्मिक धोरण व श्री देव दर्शन' या विषयावर व्याख्यान होईल. तर, रात्री नऊ वाजता राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश काळे व सहकलाकार यांचे सुश्राव्य गायन होईल.

24 डिसेंबरला श्री मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण होणार असून रात्री आठ वाजता आर्या आंबेकर आणि त्यांच्या सहकलाकारांचे सुगमसंगीत होईल. शेवटच्या दिवशी सकाळी सात वाजता समाधी मंदिरावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. धार्मिक कार्यक्रमानंतर महोत्सवाची सांगता होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT