पुणे

धक्कादायक! गौण खनिज चोरी नियंत्रण पथकच तडजोडीत मग्न

Laxman Dhenge

[author title="सिताराम लांडगे" image="http://"][/author]

लोणी काळभोर : पुण्याच्या जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील गौण खनिजाची चोरी करणार्या माफियांवर कारवाईसाठी स्थापन केलेले पथकच या माफियांशी तडजोडी करण्यात मग्न असल्याचे समोर आले आहे. कारवाई करण्या ऐवजी तडजोडीचा धंदा पथकाने जोरात सुरु केला असून जिल्हाधिकाऱ्यांच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला आहे. मंगळवारी(दि.२८) या पथकाने हवेली तालुक्यात खडी वाहतूक करणाऱ्या शेकडो वाहनांची तपासणी केली परंतु या दंडाच्या कारवाईची भर सरकारी तिजोरीत झालीच नाही, इतर कोणाचे खिसे यात गरम झाले याची चौकशी आता जिल्हाधिकाऱ्यांनी करण्याची गरज आहे.

या पथकाने कोणत्याही वाहनावर कारवाई केल्याचा अहवाल ना जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला ना लोणी काळभोर अप्पर तहसिल कार्यालयालयात जमा केला,मग हा लाखो रुपयांचा मलीदा कोणी रिचवला याची जोरदार चर्चा महसूल विभागात सुरू आहे.  पुणे जिल्ह्यात महसूल विभागाने वाळु, माती, मुरुम यांचा बेकायदेशीर उपसा, टेकडी,डोंगर पोखरणे, बेकायदा गौण खनिजाची वाहतूक करणारी वहाने यांच्यावर कारवाईसाठी जिल्हाधिकारी यांनी या जिल्हा स्तरावरील पथकाची स्थापना केली आहे. अधिक माहिती घेतली असता महसुल विभागातील सूत्रांनुसार काही कागदावर दाखवण्या पुरत्या तकलादु कारवाई वगळता जिल्ह्यात कोठेही या पथकाने मोठ्या प्रमाणात कारवाई केल्याचे दिसत नाही, असे चित्र पहावयास मिळाते.

या पथकातील काही अधिकार्यांनी मंगळवारी हवेली तालुक्यातील मोठ्या प्रमाणात असलेल्या खडी क्रशर परीसरात कारवाई साठी धडक दिली,त्यांनी दोन खडी क्रशरची तपासणीही केली, त्यानंतर वाहतूक करणार्या वाहनांची तपासणी केली. जवळ जवळ दोनशे वाहनांची तपासणी केली,यातील बरीचशी वाहने बेकायदा गौण खनिजाची वाहतूक करत असल्याचे चित्र पहावयास मिळाले,परंतु पथकाला एवढी मोठी पहाणी केल्यानंतर काहीच गैर आढळले नाही असे दिसते कारण या पथकाने या कारवाईचा अहवाल तहसीलदारांकडे सादर केला नाही की एकही वाहन ताब्यात घेऊन जप्त करून जमा केलेले नाही.

अशी कोणतीही शासकीय प्रक्रिया न राबवता परस्पर वाहने सोडून दिली का अशी शंका आता महसुल विभागात व्यक्त होऊ लागली आहे. गौण खनिज वहातुकीची वाहने अशी सोडली जात नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते,परंतु मंगळवारी या पथकाने कारवाई केली परंतु शासकीय तिजोरीत दंड जमा न करता तो कोठे जमा केला याची चर्चा हवेली तालुक्यात जोरदार सुरू आहे. आता जिल्हाधिकारी या आर्थिक कारवाईवर चौकशी लावणार का याची उत्सुकता आहे

पथकाच्या कारवाया वादाच्या भोवर्यात

गौणखनिज पथकाची स्थापना कारवाई साठी केली आहे परंतु यांच्या सर्व कारवाया वादाच्या भोवर्यात सापडल्या असल्याचे समजते, कारवाईला जाताना शासकीय अधिकारी व कर्मचारी आवश्यक असताना या पथकात खासगी दलालांचा भरणा असतो असेही समजते, शासकीय वाहन कारवाई साठी घेऊन जाणे आवश्यक असताना या पथकात खासगी वाहने कारवाई साठी वापरली जातात. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजांची चोरी होते, त्यावर कारवाई होण्या ऐवजी पुणे शहर व उपनगरातील मोठ्या बांधकाम व्यावसायिकांच्या गृह प्रकल्पावर छापा टाकण्यातच मोठा रस या पथकाला असतो याची संपूर्ण चौकशी करण्याची गरज आहे.

तहसीलदारांवर हल्ला, पथक थंड

वाळूचोरांनी इंदापूरच्या तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला केल्यानंतर या पथकाने खरेतर आपला मोहरा इंदापूर, दौंड कडे वळवून या माफियांवर दरारा बसेल अशी कारवाई हाती घेण्याची गरज होती, परंतु पथक थंडच राहीले आणि पुणे शहर परीसरात घुटमळत राहीले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT