शिवरायांचा इतिहास आता कन्नड भाषेत File Photo
पुणे

Shivaji Maharaj Kannada Book: शिवरायांचा इतिहास आता कन्नड भाषेत

या वेळी कन्नड भाषेतील पहिल्या ‘समग्र शिवचरित्र’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Shivaji Maharaj history in Kannada

खडकवासला: बंगळुरू (कर्नाटक) येथे प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 352 व्या ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी कन्नड भाषेतील पहिल्या ‘समग्र शिवचरित्र’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

पुण्यातील मावळा जवान संघटना आणि कर्नाटक मराठा वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बंगळुरू प्रेस क्लबच्या सभागृहात हा सोहळा होणार आहे. या वेळी तंजावरचे महाराज श्रीमंत शिवाजीराजे भोसले, कर्नाटकचे माजी मंत्री पी. जी. आर. (Latest Pune News)

सिंदिया, विजयनगर साम्राज्याचे वंशज राजा कृष्णदेवराया, असोसिएशनचे अध्यक्ष मनोजकुमार रनोरे, पुणे जिल्हा दिव्यांग विकास आघाडीचे अध्यक्ष बाजीराव पारगे, शिवगर्जना सेनेचे अध्यक्ष प्रवीण माने, मावळा जवान संस्थेचे उपाध्यक्ष सचिन पायगुडे, कार्याध्यक्ष रोहित नलावडे आदी सहभागी होणार आहेत.

पुण्यातील इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांनी लिहिलेल्या मूळ मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषांतील शिवचरित्राचा कन्नड भाषेत प्रा. शिवाजीराव चव्हाण यांनी अनुवाद केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास कन्नडभाषक जनतेपर्यंत पोहविण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले आहे.

दत्ताजी नलावडे म्हणाले की, भारतीयांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या अतुलनीय शौर्याची माहिती मिळावी, यासाठी शिवचरित्राचा कन्नड भाषेत अनुवाद करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT