पुणे: अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला ‘माझा गड माझी जबाबदारी’ हे ब्रीदवाक्य घेऊन सोहळ्याची व्याप्ती वाढविणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष आणि स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात तयारीसंदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. (Latest Pune News)
या बैठकीला युवराजकुमार शहाजीराजे, समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर, उपाध्यक्ष अतुल चव्हाण, सत्यजित भोसले, प्रशांत दरेकर, कार्याध्यक्ष सुखदेव गिरी, तसेच चैत्राली कारेकर, हेमंत साळोखे, फत्तेसिंह सावंत, उदय घोरपडे, प्रवीण पवार, संजय पवार, डॉ. धनंजय जाधव, राजेंद्र कोंढरे आणि इतर अनेक पदाधिकार्यांसह हजारो शिवभक्त उपस्थित होते.
संभाजीराजे म्हणाले, ‘माझा गड माझी जबाबदारी’ हे ब्रीदवाक्य लक्षात घेऊन प्रत्येक शिवभक्ताने गडाची स्वच्छता, शिस्त आणि पावित्र्य राखण्याची जबाबदारी स्वयंस्फूर्तीने पार पाडावी.
युवराज्ञी संयोगीताराजे म्हणाल्या, हा सोहळा शिवभक्तांचा आहे, तो खर्या अर्थाने लोकोत्सव आहे. त्यामुळे शिवभक्तांनी समितीच्या उपसमित्यांना सहकार्य करून आगळावेगळा आदर्शनिर्माण करावा.