Omraje Nimbalkar file photo
पुणे

Omraje Nimbalkar: ठाकरेंच्या सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर 'नॉट रिचेबल'; घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त!

ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ठाकरेच्या सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Omraje Nimbalkar

पुणे: ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ठाकरेच्या सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एरव्ही २४ तास फोन सुरू असणाऱ्या खासदार ओमराजे निंबाळकर यांचा फोन नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांचा गट फुटणार असल्याची चर्चा सुरू असतानाच पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा जोरदार सुरू आहे. शिवसेना उबाठात फूट पाडण्यासाठी आवश्यक असलेला ६ खासदारांचा आकडा सोमवारी अखेर पूर्ण झाला असून शिवसेनेच्या वर्धापनदिनी (ता. १९ जून) हे ६ खासदार उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व सोडून एकनाथ शिंदे यांचा झेंडा हाती घेणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे हे ६ खासदार मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाल्याचेही समजते. शिवसेनेच्या फुटणाऱ्या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्याही नावाची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ओमराजे यांच्या पुण्यातील बाणेरमधील निवासस्थानाबाहेर पोलीसांनी रात्रीपासून बंदोबस्त वाढवला आहे.

ओमराजें निंबाळकरांनी बाजू बदलल्याने गणित जुळले

दोन तृतीयांश फूट प्रत्यक्षात यावी यासाठी शिवसेना उबाठाचे नऊ खासदार निवडून आल्याने सहा खासदारांची गरज होती. गेल्या काही दिवसांत उद्धव ठाकरे यांचे खंदे पाठीराखे असलेल्या ओमराजे निंबाळकर यांनी बाजू बदलल्याने आकड्यांचे गणित पूर्ण झाले.

यांची बंडखोरी ?

संजय जाधव, नागेश आष्टीकर, संजय दीना पाटील, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे यांचा बंडखोरांमध्ये समावेश.

खासदार फोडण्यासाठी १५ कोटी अॅडव्हान्स

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फुटणार अशी चर्चा असताना संजय राऊत यांनी, महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री प्रत्येकी १५ कोटींचा अॅडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक असल्याचे ट्विट केले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT