UBT MNS Pune Manifesto Pudhari
पुणे

Shiv Sena UBT MNS Pune Manifesto: ‘शब्द ठाकरेंचा… पुण्याच्या विकासाचा’ : शिवसेना उबाठा–मनसेचा संयुक्त वचननामा जाहीर

विकासाच्या नावाखाली लूट व पर्यावरण हानीचा आरोप; भाजपला रोखण्यासाठी एकत्र मैदानात उतरण्याची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: विकासाच्या नावाखाली पुणेकरांच्या करातून आलेल्या पैशांची खुलेआम लूट भाजप करत आहे. नको असलेले प्रकल्प पुणेकरांच्या माथ्यावर लादत आहेत. मुळा-मुठा नदीचे सुशोभीकरण करण्याच्या नादात पर्यावरणाचे मोठे नुकसान केले जात आहे. रस्ते, बोगदे करण्याच्या नावाखाली टेकड्या उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान आखले जात आहे. शहरात गुन्हेगारीचे थैमान वाढले आहे, म्हणूनच आम्ही भाजपला रोखण्यासाठी सर्व ताकदीनिशी मैदानात उतरत आहे, असे शिवसेना उबाठा आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

पुण्यातील नवी पेठ येथे असलेल्या मनसे कार्यालयात शुक्रवारी (दि. 9) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकत्रित ‌‘शब्द ठाकरेंचा... पुण्याच्या विकासाचा‌’ हा वचननामा जाहीर करण्यात आला. यावेळी मनसे-शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्यांनी पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना उबाठा शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, मनसेचे नेते बाबू वागस्कर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर व अन्य उपस्थित होते. उपस्थित मनसे-शिवसेना उबाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वचननामा वाचून दाखवला.

वचननाम्यात काय?

  • नवीन रस्त्यांची निर्मिती करणार

  • नवीन उड्डाणपुलांची निर्मिती करणार

  • वाहतूक सुरळीत करण्यासाठी 1 हजारपेक्षा अधिक वॉर्डनची नेमणूक करणार

  • पुणे शहर वाहतूक कोंडी मुक्त करणार

  • उच्च तंत्रज्ञान वापरून भक्कम रस्त्यांची बांधणी करणार

  • पिवळ्या, केशरी शिधापत्रिकाधारक नागरिकांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणार

  • गुन्हेगारीमुक्त पुणे अन्‌‍ शहराला 24 तास पाणी पुरवठा करणार

  • आधुनिक कचराप्रक्रिया प्रकल्प उभारणार

  • पर्यावरणपूरक पद्धतीने नदी पुनरुज्जीत करणार

  • महापालिका शाळांमधील विद्यार्थीसंख्या वाढवण्यावर भर देणार

  • पादचारी मार्ग निर्माण करून, पादचारी मार्ग अतिक्रमणमुक्त करणार

  • गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी नवीन स्वच्छतागृह निर्मिती करणार

  • पीएमपीची आर्थिक तूट दूर करणार; महिलांसाठी बस फी

  • जुने वाडे पुनर्बांधणी व पुनर्वसनसाठी प्रयत्न करणार

  • हवा प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करणार

  • पुणे झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार

  • प्लास्टिकमुक्त पुणे करण्यासाठी प्रयत्न करणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT