पुणे

जेजुरीतील इंडियाना ग्रेटीग्जसमोर शिवसेनेचे ठिय्या आंदोलन

अमृता चौगुले

जेजुरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जेजुरी औद्योगिक वसाहतीतील इंडियाना ग्रेटीग्ज कंपनीतील १२ कामगारांना आठ महिन्यांपूर्वी कामावरून काढण्यात आले आहे. याच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटाच्यावतीने कंपनीच्या गेटसमोर लाक्षणिक ठिय्या आंदोलन करण्यात आले. जेजुरी एमआयडीसीतील इंडियाना कंपनीतील १२ कामगारांना मागील ८ महिन्यांपासून कामावरून काढण्यात आले आहे. या कामगारानी विनंती अर्ज करूनही त्यांना कामावर घेतले नाही. या कामगारांना न्याय मिळण्यासाठी तसेच त्यांना कामावर घेण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्यावतीने माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ दिवसांपूर्वी कंपनी प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते; मात्र त्याकडे कंपनीने दुर्लक्ष केले होते. या निषेधार्थ शुक्रवारी (दि. ११) सकाळी कंपनीच्या गेटसमोर पुरंदर तालुका शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेना, तसेच शिवसेना महिला आघाडीच्या वतीने लाक्षणिक ठिय्या आंदोलन करण्यात आले.

गेली २५ वर्षे नियमितपणे काम करण्याऱ्या कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आहे. कामगारांचे आई-वडील, पत्नी, मुले यांची जबाबदारी या कामगारांवर असून या कामगारांचे संसार उघडे पडले आहेत. कंपनीने यांना मानसुकीच्या नात्याने न्याय द्यावा; अन्यथा शिवसेनच्या वतीने आणखी आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा जेजुरीचे शिवसेना शहराध्यक्ष विठ्ठल सोनवणे यांनी दिला आहे.

या आंदोलनात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख गीतांजली ढोणे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शालिनी पवार, जेजुरी शहर शिवसेनाप्रमुख विठ्ठल सोनवणे, तालुक्यातील पदाधिकारी मंगेश भिंताडे, अविनाश बडदे, सिद्धार्थ मुळीक, सागर भुजबळ, पोपट खेंगरे, राहुल यादव, वैशाली काळे, मिलिंद इनामके, स्वप्नील गायकवाड, माऊली शिंदे, शिवसेना कार्यकर्ते, तसेच महाराष्ट्र राज्य युवक विकास व्यसनमुक्त संघाचे बाळासाहेब काळे, आनंद नाईक, मच्छिंद्र नागरगोजे तसेच कामगार आणि त्यांचे कुटुंबीय या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

कोव्हिड कालावधीत या १२ कामगारांची उपस्थिती कमी भरल्याने गेली आठ महिन्यांपूर्वी कामावरून काढण्यात आले आहे. या कामगारांवर अन्याय झाला असून त्यांना हिन वागणूक देण्यात आली आहे. गेली आठ महिने या कामगारांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. १५ दिवसांपूर्वी निवेदन देवूनही कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे.

– गीतांजली ढोणे,
संपर्कप्रमुख, बारामती लोकसभा मतदारसंघ

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT