ष्टसहस्र दीपोत्सवातून शिवरायांना मानवंदना Pudhari
पुणे

Shiv Jayanti Mahotsav Pune: अष्टसहस्र दीपोत्सवातून शिवरायांना मानवंदना! पुण्यात दिवाळी पाडव्याला अनोखा सोहळा

एसएसपीएमएस येथील शिवछत्रपती स्मारकात 8 हजार पणत्यांनी उजळणार ऐतिहासिक दीपोत्सव; स्वराज्य घराण्यांचा सन्मान सोहळा

पुढारी वृत्तसेवा

पुणे : शिवजयंती महोत्सव समिती पुणेतर्फे दिवाळी पाडवा बुधवारी दि. 22 ॲाक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता “श्री छत्रपती शिवाजी महाराज दीपोत्सव सोहळा” पर्व 14 वे याचे आयोजन श्री शिवछत्रपती स्मारक, एसएसपीएमएस येथे करण्यात आले आहे, अशी माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.(Latest Pune News)

दीपोत्सवाचे उद्घाटन पोलिस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील तसेच शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या स्वराज्य घराण्यांच्या हस्ते होणार आहे. शिवरायांचे हे जगातील पहिले भव्य अश्वारूढ स्मारक आहे तसेच एकसंध ओतीव काम केलेले एकमेव स्मारक आहे. पुतळ्याचे यंदा 98 व्या वर्षात पदार्पण झाले आहे. पुतळ्याचे वजन तब्बल 8000 किलो आहे. त्यामुळे प्रत्येक किलोमागे एक पणती अशा 8 हजार पारंपरिक पणत्यांची मानवंदना देण्यात येणार आहे.

स्वराज्यनिष्ठ येसाजी कामठे, श्रीमंत हरजीराजे बर्गे, शिवरायांचे शिलेदार डिंबळे, श्रीमंत तापकीर सरदार, वीर सरदार मालोजी भिलारे, पानिपत वीर महादजी माळवदकर, पानिपत वीर महादजी व दादजी हरपळे, दक्षिण दिग्विजय वीर मानाजी मोरे या स्वराज्य घराण्यांचा शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागाची यशस्वी 5 वर्षे पूर्ण केल्याबद्दल सन्मान करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT