Shirur Ganja Seizure Pudhari
पुणे

Shirur Ganja Seizure: शिरूरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; २५० किलो गांजा जप्त, किंमत दीड कोटींहून अधिक

हैदराबादहून यवतमार्गे गांजाची वाहतूक; पोलिसांनी पाठलाग करून वाहन पकडले, दोघे ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

शिरूर: पोलिसांनी गांजा घेऊन जात असलेल्या गाडीच्या पाठलाग करून २५० किलोहून अधिक व अंदाजे १ कोटी ५२ लाख रुपये हून अधिक रुपयांचा गांजा पुणे पोलीस व शिरूर पोलिसांनी जप्त करण्या बरोबरच दोन जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिली.

मोठ्या प्रमाणावर गांजा घेऊन एक वाहन यवतच्या बाजूने शिरूर कडे जात असल्याची माहिती शिरूर पोलिसांना रात्री मिळाली त्यानंतर शिरूर पोलिसांनी निमोणे सह शिरूर शहरात नाकाबंदी केली होती. रात्रीच्या सुमारास शिरूर गोलेगाव रस्त्या लगत सुंदर सृष्टी जवळ गाडी आली असता पोलिसांनी गाडी अडविण्याचा प्रयत्न केला.

पण गाडीने चकवा दिला. त्यानंतर पोलिसांनी गाडीच्या पाठलाग सुरु केला. गाडी स्टेट बँक कॉलनी परिसरात घुसली त्याठिकाणी गाडी पकडण्यात आली. गाडीत व्यवस्थित पंकिंग केलेल्या गांजा आढळून आला गांजाची मोजणी सुरु असून अंदाजे २५० किलोहून अधिक व दीड कोटी रुपये पेक्षा अधीक किमंतीचा गांजा असल्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी सांगितले.

दरम्यान पोलीस उपअधिक्षक रवींद्र भोसले यांनी सांगितले की एसबीआय कॉलनी परिसरात अँटी नार्कोटिक पथक व पोलिसांनी कारवाई करून राज्यभर गांजाचा पुरवठा करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे.

तब्बल दीड कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून पोलीस उपायुक्त गोहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई करण्यात आली आहे. हैद्राबाद हून यवत मार्गे गांजा येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी विविध ठिकाणी नाकेबंदी लावली होती. शिरूर मध्ये पोलिसांनी गांजा घेऊन जाणारी गाडी पाठलाग करुन अडवून त्यातून २५० किलो गांजा व दोन जणांना ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT