शिरूर: शिरूर नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. सदर प्रभाग रचना कार्यालयीन वेळेत नगरपरिषदेच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध असेल. तसेच नगरपरिषदेच्या वेबसाईटवर देखील उपलब्ध करण्यात आली आहे. त्यावर नागरिकांना 31 ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.
नव्या प्रभाग रचनेनुसार शिरूर नगरपरिषदेची सदस्य संख्या वाढली आहे. मागील निवडणुकीत एकूण 21 नगरसेवक होते. यावेळी सदस्य संख्या 3 ने वाढून 24 झाली आहे. एकूण 12 प्रभाग असून प्रत्येक प्रभागातून 2 नगरसेवकांची निवड होणार आहे. त्यात महिलांसाठी आरक्षण आहे. (Latest Pune News)
मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाग रचना 18 ऑगस्ट रोजी जाहीर झाली. 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांकडून हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहेत. प्राप्त झालेल्या हरकतींवर सुनावणी करून अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाईल.
सन 2016 रोजी झालेल्या शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत दहा प्रभागातून 21 नगरसेवक व जनतेतून नगराध्यक्ष अशी निवडणूक झाली होती. शिरूर विकास आघाडीची सत्ता नगरपरिषदेत आली होती. आता नऊ वर्षांनी नगपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे.
यावेळी 12 प्रभागातून 24 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. नगराध्यक्षाची निवड जनतेतून होणार आहे.मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाग रचना 18 ऑगस्ट रोजी जाहीर झाली. 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांकडून हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहेत. प्राप्त झालेल्या हरकतींवर सुनावणी करून अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाईल.
सन 2016 रोजी झालेल्या शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत दहा प्रभागातून 21 नगरसेवक व जनतेतून नगराध्यक्ष अशी निवडणूक झाली होती. शिरूर विकास आघाडीची सत्ता नगरपरिषदेत आली होती. आता नऊ वर्षांनी नगपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यावेळी 12 प्रभागातून 24 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. नगराध्यक्षाची निवड जनतेतून होणार आहे.