शिरूरमधील 96 ग्रा.पं.च्या सरपंचपदांची सोडत  Pudhari
पुणे

Shirur News: शिरूरमधील 96 ग्रा.पं.च्या सरपंचपदांची सोडत

रांजणगाव गणपती, टाकळी हाजी ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण; कारेगाव ग्रामपंचायत ओबीसीसाठी राखीव

पुढारी वृत्तसेवा

शिरूर: शिरूर तालुक्यातील 96 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत तहसील कार्यालयात शुक्रवारी (दि. 11) काढण्यात आली.तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सोडतीबाबत माहिती दिली. यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण काढण्यात आले होते. उरलेल्या 89 ग्रामपंचायत सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

या सोडतीत माजी आमदार अशोक पवार यांचे वडगाव रासाईचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिलासाठी तर माजी आमदार कै. बाबूराव पाचर्णे यांच्या तर्डोबाचीवाडीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. (Latest Pune News)

भाजपनेत्या जयश्री पलांडे व माजी आमदार काकासाहेब पलांडे यांच्या मुखईचे सरपंचपद अनुसूचित जाती महिला तर औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची मानल्या जाणार्‍या तसेच जनता दल प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे, माजी सभापती विश्वास कोहोकडे यांच्या कारेगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. कवठे येमाई, कान्हूर मेसाईचे सरपंचपद ओबीसीसाठी तर शिरूर ग्रामीण, रांजणगाव गणपती, टाकळी हाजी या ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण वर्गासाठी जाहीर झाले.

सरपंचपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे- अनुसूचित जाती महिला - निमगाव म्हाळुंगी, मुखई, जांबूत, वढू बुद्रुक. अनूसूचित जाती - आमदाबाद, गोलेगाव, वाजेवाडी, हिवरे. अनूसूचित जमाती महिला - वडगाव रासाई, माळवाडी. अनुसूचित जमाती - कुरुळी.

नागरिकांचा मागासवर्ग महिला - कर्डे, चव्हाणवाडी, म्हसे बुद्रुक, पिंपरी दुमाला, वाडा पुनर्वसन, सादलगाव, पिंपळसुटी, नांगरगाव, निमगाव भोगी, आलेगाव पागा, बाभूळसर बुद्रुक, पिंपळे जगताप, रावडेवाडी,

नागरिकांचा मागासवर्ग - कासारी, शरदवाडी, अण्णापूर, कारेगाव, मिडगुलवाडी, कोळगाव डोळस, वाघाळे, पारोडी, खंडाळे, फाकटे, कवठे येमाई, आंधळगाव, कान्हूर मेसाई.

सर्वसाधारण महिला - आंबळे, कळवंतवाडी, धानोरे, शिंदोडी, निमगाव दुडे, केंदुर, विठ्ठलवाडी, पिंपरखेड, गणेगाव दुमाला, बुरुंज वाडी, कोंढापुरी, टाकळी भीमा, चिंचोली मोराची, गुनाट, उरळगाव, शिक्रापूर, निर्वी, कोरेगाव भीमा, दरेकरवाडी, आपटी, न्हावरा, पाबळ,धामारी, जातेगाव बुदृक, डिंग्रजवाडी, खैरेनगर, मोटेवाडी, वरुडे, निमोणे, तर्डोबाचीवाडी.

सर्वसाधारण - ढोकसांगवी, भांबर्डे, संविदणे, बाभुळसर खुर्द, चिंचणी, शिरूर ग्रामीण, काठापूर खुर्द, वडनेर खुर्द, शिरसगाव काटा, टाकळी हाजी, चांडोह, करंदी, रांजणगाव सांडस, तांदळी, मांडवगण फराटा, तळेगाव ढमढेरे, सोने सांगवी, दहिवडी, सणसवाडी, मलठण, रांजणगाव गणपती, सरदवाडी, इनामगाव, खैरेवाडी, जातेगाव खुर्द, गणेगाव खालसा, करंजावणे, पिंपळे खालसा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT