कोरेगाव भीमा: सणसवाडी (ता. शिरूर) येथील परिसरातील एका पाचवर्षीय मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
फंटूसदास दिलीप मोची (सध्या रा. सणसवाडी, ता. शिरूर, मूळ रा. गोपाळपूर ता. चानन कुमादर, जि. लखीसराय, बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Pune News)
याप्रकरणी अधिक माहितीनुसार, आई घरात असताना पीडित मुलगी ही तिच्या भावासोबत घराच्या अंगणात खेळत होती. त्या वेळी आरोपी मोची याने भावाला चॉकलेट आणण्यासाठी पैसे देऊन दुकानात पाठवले. त्यानंतर मुलीला शेजारील खोलीमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विजय मस्कर हे पुढील तपास करत आहेत.