कमानीवरील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हे छायाचित्र झाकण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. Pudhari News Network
पुणे

बारामतीत शिंदे गट - राष्ट्रवादी आमनेसामने; अजित पवारांचा फोटो काळ्या कापडाने झाकला

Shivsena vs NCP | शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला पोलिसांनी घेतले ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

बारामती : पुढारी वृत्तसेवा: बारामतीत शिवसेना शिंदे गटाकडून (Shivsena vs NCP) आयोजित एकनाथ गणेश फेस्टीव्हलला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी न लावल्याने संतापलेल्या जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी त्यांनीच लावलेल्या कमानीवरील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो काळे कापड टाकून झाकल्याने येथील भिगवण चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जेवरे यांना ताब्यात घेतले.

या प्रकारानंतर नगरपरिषदेने भिगवण चौकात जेवरे यांनी उभी केलेली कमान व त्यावरील छायाचित्रे काढून घेतली. या प्रकारावरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी आमनेसामने आल्याची स्थिती बारामतीत पाहायला मिळाली. माजी नगरसेवक अभिजित काळे यांनी चौकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालत या प्रकाराला प्रत्युत्तर (Shivsena vs NCP) दिले.

यंदा शिवसेनेने बारामतीत एकनाथ गणेश फेस्टीव्हलचे आयोजन केले आहे. या फेस्टिव्हलमध्ये दहा दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. प्रेक्षकांना बसण्यासाठी भव्य वॉटरप्रूफ मंडप, खुर्च्या, कार्यक्रमासाठी स्टेज अशी व्यवस्था केली आहे. या फेस्टिव्हलच्या उदघाटनाला यावे, अशी विनंती जेवरे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली होती. रविवारी (दि. ८) बारामतीत पवार यांनी विविध गणेश मंडळांना भेटी देत आऱती केली. त्यांचे कुटुंबिय अन्य ठिकाणी हजर राहिले. परंतु या फेस्टिव्हलकडे ते आले नाहीत. त्या संतापातून जेवरे यांनी हे पाऊल उचलले.

भिगवण चौकासह शहरात त्यांनी कमानी उभ्या केल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची छायाचित्रे लावली आहेत. परंतु पवार यांनी महायुतीतील घटक पक्षाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने हा प्रकार करण्यात आला. पोलिस निरीक्षक विलास नाळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जेवरे यांना ताब्यात घेण्यात आले.पोलिस निरीक्षक विलास नाळे म्हणाले, कमानी किंवा त्यावरील फोटोवरून वातावरण बिघडत असेल तर कारवाई केली जाईल. आम्ही नगरपरिषदेला पत्र दिले असून त्यांनी अशा कमानी काढून टाकाव्यात.

भिगवण चौकासह शहरात त्यांनी कमानी उभ्या केल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची छायाचित्रे लावली आहेत. परंतु पवार यांनी महायुतीतील घटक पक्षाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने हा प्रकार करण्यात आला. पोलिस निरीक्षक विलास नाळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जेवरे यांना ताब्यात घेण्यात आले.पोलिस निरीक्षक विलास नाळे म्हणाले, कमानी किंवा त्यावरील फोटोवरून वातावरण बिघडत असेल तर कारवाई केली जाईल. आम्ही नगरपरिषदेला पत्र दिले असून त्यांनी अशा कमानी काढून टाकाव्यात.

सुरेंद्र जेवरे यांनी सुनेत्रा पवारांचा केला होता प्रचार

सुरेंद्र जेवरे यांनी यापूर्वी लोकसभा निवडणूकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा जोरदार प्रचार केला होता. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर झाल्यानंतर त्यांनी पक्षाच्या वतीने बारामतीत स्वतंत्र व्यवस्था करत सुमारे २२ हजारांहून अधिक महिलांचे अर्ज भरून घेतले होते. त्यांच्या या केंद्राला उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला-बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनेत्रा पवार यांनी भेट दिली होती. रक्षाबंधनाला तर खा. सुनेत्रा पवार यांनी जेवरे यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना राखी बांधली होती.

या महोत्सवात केंद्र व राज्याच्या विविध योजनांची माहिती दिली जात आहे. हा कार्यक्रम सर्वसामान्य जनतेचा आहे. आम्ही आमच्या बॅनरवर अजित पवार यांना स्थान दिले होते,त्यांना केले होते,परंतु ते किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही आमच्या कार्य़क्रमाला आले नाहीत. त्यातून त्यांनी एक प्रकारे मुख्यमंत्र्यांचाच अपमान केला आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही त्यांचा फोटो कापडाने झाकून निषेध करत आहोत. पोलिसांनी यात हस्तक्षेप करू नये, आम्ही सर्व परवानग्या घेवूनच कार्यक्रम करत आहोत.
- सुरेंद्र जेवरे, जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT