पुणे

महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा !

अमृता चौगुले

पुणे : महाराष्ट्र गो सेवा आयोगाच्या पहिल्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्यात प्रथमच स्थापित झालेल्या महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे प्रथम अध्यक्ष होण्याचा मान शेखर मुंदडा यांना मिळाला आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने गोमांसावर बंदी घालण्यासाठी २०१५ च्या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी आणि पशुधनाच्या सर्वांगीण भल्यासाठी उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र गो सेवा स्थापन केला आहे.

महाराष्ट्रभरातील अडीच हजार पेक्षा अधिक स्वयंसेवी संस्थांचे जाळे व आतापर्यंत हजारो निष्पाप गाईंचे कसयांपासून प्राण वाचवण्यात मुंदडा यांची खूप महत्वाची भूमिका बजावली आहे. या समितीमध्ये सुनील सूर्यवंशी, संजय भोसले, डॉ.नितीन मार्केडेय, सनतकुमार गुप्ता, उद्धव नेरकर, दीपक भगत यां निम शासकीय सदस्यांचा देखील समावेश आहे. आता शासन दरबारी सामाजिक व गोरक्षकांच्या अडचणी सहजतेने सोडविण्यात यश येतील, अशी भावना मुंदडा यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT