बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना नातू म्हणून उमेदवारी दिलेली नाही. ते राजकारणात नेहमीच तरुणांना संधी देतात. युगेंद्र पवार यांचे काही गुण त्यांना दिसले असतील. या प्रकारात आईंना (अजित पवार आणि श्रीनिवास पवार यांच्या आई) ओढणे चुकीचे असल्याचे मत शर्मिला पवार यांनी व्यक्त केले. शर्मिला पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सख्ख्या भावजय; तर मविआचे उमेदवार युगेंद्र यांच्या मातोश्री आहेत.
त्या म्हणाल्या, आई आज 84 वर्षांच्या आहेत. त्यांना याच्या वेदना होत आहेत. दादांनी चूक मान्य केली. घरातला उमेदवार देऊ नये, असे ते म्हणतात. परंतु शरद पवार हे नेहमी तरुणांना संधी देतात. युगेंद्र हे गेली काही वर्षे बारामतीत काम करत आहेत. शरद पवार यांच्या आशीर्वादाने निवडणुकीला खंबीरपणे सामोरे जात आहेत, असे शर्मिला पवार म्हणाल्या.