पुणे

Sharad Pawar : ऊस उत्पादनात एआय ठरणार गेम चेंजर; शरद पवार यांना विश्वास

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ऊस उत्पादन करताना त्यात साखरेचे प्रमाण किती हे आता आय.(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या तंत्रज्ञानाने मोजता येणार आहे. त्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) मध्ये इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठासह मायक्रासॉफ्ट कंपनी सोबत करार करुन संशोधन केले जाणार आहे. या ठिकाणी लवकरच त्यावर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी दिली.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर अ‍ॅग्रीकल्चरल टेक्नोलॉजी अ‍ॅन्ड क्लायमेट चेंज हा अभ्यासक्रम मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटमध्ये सुरु करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संचालक डॉ. अजित जावकर, सारंग नेरकर, मायक्रोसॉफ्टचे डॉ, प्रशांत मिश्रा, अग्रीकल्चरल डेव्हलपमेन्टचे अध्यक्ष प्रताप पवार यांची उपस्थिती होती.

पवार यांनी सांगितले की, या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी शेतात योग्य प्रमाणात पाणी, खत घालणे, किड व्यवस्थापन, उत्पादनाची वाढ, बदलते हवामान, बाजार भावाचा अंदाज बांधणे ही कामे अधिक सक्षमपणे करु शकणार आहे. तसेच उसाचे उत्पादन घेताना एकरी उत्पादन, टनेजचा, साखर उतारा अंदाज घेता येईल.

राजकीय प्रश्नांवर नो कॉमेन्टस..

शरद पवार यांची पत्रकार परिषद असल्याने प्रसार माध्यम प्रतिनिधींनी गर्दी केली. सर्वांनी कॅमेरा, साऊंड, लाईटही चेक करुन सज्ज ठेवला. मराठा आरक्षणासह इतर प्रश्न येताच पवार यांनी दोन्ही हात जोडून इथे राजकीय प्रश्न नको म्हणत पत्रकार परिषदेतून निरोप घेतला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT