शरद पवार हे माझे दैवत, त्यांचा अपमान करणार नाही : अजित पवार File Photo
पुणे

Ajit Pawar | शरद पवार हे माझे दैवत, त्यांचा अपमान करणार नाही : अजित पवार

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा मी अपमान करणार नाही. मी त्यांना दैवत मानतो.

पुढारी वृत्तसेवा
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा मी अपमान करणार नाही. मी त्यांना दैवत मानतो. जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत कोण किती वेळ बोलले आणि मी किती ऐकले, याचे रेकॉर्ड आहे. पण, उगीच सहानुभूती मिळविण्यासाठी काही जण म्हणतात की, साहेबांना बोलू दिले नाही.

मी कसा बोलू - देणार नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (दि. २१) खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काळेवाडी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी शहराध्यक्ष योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, जगदीश शेट्टी, नाना काटे, श्याम लांडे, प्रशांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा मी अपमान करणार नाही.

मी त्यांना दैवत मानतो. जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत कोण किती वेळ बोलले आणि मी किती ऐकले, याचे रेकॉर्ड आहे. पण, उगीच सहानुभूती मिळविण्यासाठी काही जण म्हणतात की, साहेबांना बोलू दिले नाही. मी कसा बोलू - देणार नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (दि. २१) खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काळेवाडी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी शहराध्यक्ष योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, जगदीश शेट्टी, नाना काटे, श्याम लांडे, प्रशांत पवार म्हणाले की, मावळलाच जास्त निधी दिला, अशी टीका डीपीसीच्या बैठकीत खासदार डॉ. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे यांनी केली.

मी भेदभाव करणारा नाही. विकासकामांसाठी निधी देत नाही, अशा प्रकारे आरोप करून निव्वळ नरेटिव्ह निर्माण करण्याचे काम केले जात आहे. मी जातीभेद, जातीयवाद करणारा नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षातून बाहेर पडले पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून काही जण स्वतःच्या स्वार्थासाठी बाहेर पडले. त्याचा त्यांना लखलाभ आहे.

ही जागा जर भाजपला गेली तर मी आमदार कसा होणार, असा त्यांचा प्रश्न होता, अशी टीका अजित पवार यांनी अजित गव्हाणे यांच्यावर केली. गुंतवणूक वाढविण्यासाठी श्वेतपत्रिका महाराष्ट्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी श्वेतपत्रिका काढणार आहे. पवना, इंद्रायणीचे प्रदूषण कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये ११५० कोटींचे सिव्हरेज ट्रीटमेंट प्लॉट बसवतो आहे, असे पवार यांनी नमूद केले.

शहराध्यक्ष निवड लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष निवडण्यासाठी मी चाचपणी करीत आहे. येत्या दोन ते चार दिवसांत त्याबाबत निर्णय घेतला जाईल. सकाळी आपल्यासोबत आणि सायंकाळी दुसरीकडे असे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी करू नये, असेही पवार यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांची झुंबड आणि पोलिस काळेवाडी येथे मेळाव्यापूर्वी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ दिलेली होती. त्यामुळे येथे त्यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्त्यांची एकच झुंबड उडाली होती. पर्यायाने, पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

'निवडणुकांसाठी ताकद वाढवा'

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी जरी आपली युती असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला ताकद वाढविण्यास मुभा आहे. त्यामुळे त्याच्या तयारीला लागा, असे विधान अजित पवार यांनी केले. त्यांचा रोख एका अथनि या निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सज्ज राहावे, असाच असल्याची चर्चा रंगली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT