Sharad Pawar Health Update Pudhari
पुणे

Sharad Pawar Health Update: शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा, रुबी हॉल क्लिनिकने दिली हेल्थ अपडेट; डिस्चार्ज कधी मिळणार?

Sharad Pawar Health Update: शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

Rahul Shelke

Sharad Pawar Health Update: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून, वेदनाही कमी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे. रुबी हॉल क्लिनिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती समाधानकारक असून, त्यांना बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येण्याची शक्यता होती.

शरद पवार यांना सोमवारी अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवले होते. डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्या प्रकृतीची नियमित तपासणी करून उपचार सुरू केले.

उपचारांना शरद पवार यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांच्या वेदना कमी झाल्या असून, प्रकृतीतही सुधारणा झाली आहे. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा कायम राहिल्यास त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली होती.

रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य हृदयरोगतज्ज्ञ, अध्यक्ष आणि विश्वस्त डॉ. पुरवेझ के. ग्रँट यांनी अधिकृत निवेदनाद्वारे ही माहिती दिली. शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने त्यांच्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT