ATS Inquiry Pudhari File Photo
पुणे

Pune Shahzad Bhatti Network ATS Raids: पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी कनेक्शन? पुणे-पिंपरीत ATS चे छापे

सोशल मीडियातून तरुणांशी संपर्काचा संशय; काही संशयित ताब्यात, एटीएसकडून चौकशी सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या जाळ्यावर मोठी कारवाई करत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईदरम्यान काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती एटीएसने दिली.

एटीएसच्या प्राथमिक तपासानुसार, शहजाद भट्टी आणि त्याच्या साथीदारांनी फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅप यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून तरुणांशी संपर्क साधण्याचा तसेच त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे.

या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या संपर्क जाळ्याचा आणि त्यामागील उद्देशाचा शोध एटीएसकडून घेतला जात आहे. तपासाच्या अनुषंगाने आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान चार दिवसापूर्वी देखील महाराष्ट्रात विविध ठिकाणी एटीएसने ही कारवाई केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT