जेजुरी: जेजुरी नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सात माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुणे येथील कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला.
माजी उपनगराध्यक्ष गणेश आगलावे, माजी उपनगराध्यक्ष राजाभाऊ पेशवे, माजी उपनगराध्यक्ष सुधीर गोडसे, माजी नगरसेवक दिलीप मोरे, महेश आगलावे, सतीश घाडगे, राजेंद्र कुंभार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी संजय खोमणे (पाटील), योगेश आगलावे, बाळासाहेब बारभाई, धनंजय गोडसे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. (Latest Pune News)
या वेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पुणे जिल्हा भाजपाचे (दक्षिण) अध्यक्ष शेखर वडणे, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष साकेत जगताप, पुणे जिल्हा भटक्या विमुक्त जाती जमाती अध्यक्ष रवींद्र खोमणे, जेजुरी शहर भाजपाचे अध्यक्ष सचिन पेशवे, माजी अध्यक्ष गणेश भोसले, अलका शिंदे, मंगल पवार, जेजुरी शहर भाजपाचे पदाधिकारी कल्पेश सूर्यवंशी, सचिन मोरे, निकिता धुमाळ, प्रसाद अत्रे, सदानंद बारभाई आदी उपस्थित होते.