SPPU Pudhari
पुणे

Maharashtra SET Exam: सेट परीक्षेबाबतच्या अफवांना बळी पडू नका; पुणे विद्यापीठाचे उमेदवारांना आवाहन

महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा रविवारी २५ तारखेलाच होणार; प्रवेशपत्रे ऑनलाइन डाउनलोड करण्याच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा आयोजित केली जाते. येत्या रविवारी (दि. २५) संबंधित परीक्षा पार पडणार आहे. परंतु, समाज माध्यमांमध्ये संबंधित परीक्षेसंदर्भात उलट-सूलट चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने प्रकटन जाहीर करून परीक्षा येत्या रविवारीच होणार असून, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

विद्यापीठाच्या सेट विभागाने परिपत्रकाद्वारे परीक्षेच्या तयारीबाबत माहिती दिली आहे. परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी आवश्यक सूचना अधिकृत संकेतस्थळावर दिल्या आहेत. परीक्षार्थींनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

परीक्षेला बसणाऱ्या सर्व उमेदवारांनी आपापली प्रवेशपत्रे अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन डाउनलोड करून घ्यावीत. ऐनवेळी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी उमेदवारांनी प्रवेशपत्र आणि परीक्षेसंबंधीच्या सूचनांची वेळेत पडताळणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा समन्वयकांनी केले आहे.

अफवा आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावध राहा

महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही प्रकारच्या अफवा, अनधिकृत वृत्त किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन परीक्षा यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT