Katraj Dairy Milk Rate: कात्रज डेअरीकडून दूध खरेदी दरात वाढ; गाय दूध ४३ रुपये, तर म्हशीचे दूध ५५.२० रुपये प्रतिलिटर

चारा, वैरण आणि वाहतूक खर्चात वाढ झाल्याने निर्णय; गाय आणि म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रत्येकी एक रुपयाची वाढ, ग्राहकांसाठी विक्री दर कायम
Katraj Dairy
Katraj DairyPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज डेअरी) चारा, वैरण आणि वाहतूक खर्चात झालेल्या प्रचंड वाढीमुळे गाय आणि म्हैस दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर प्रत्येकी एक रुपयाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Katraj Dairy
Pune Water Shortage: अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पुणे जिल्हा परिषद सतर्क; उन्हाळ्यातील पाणीटंचाईसाठी आतापासून नियोजन

ही खरेदी दरवाढ बुधवारपासून (दि. २१) लागू करण्यात आली असून, शेतकऱ्यांना खरेदी दरवाढीमुळे थेट आर्थिक दिलासा मिळणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अरुण चांभारे यांनी दिली. मात्र, खरेदी दरवाढ झालेली असली तरी दुधाच्या विक्री दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Katraj Dairy
Dimbhe Right Canal: आंबेगाव-शिरूरमधील ४५ गावांवर पाणीटंचाईचे संकट; डिंभे उजव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी

या निर्णयामुळे दूध खरेदीचे नवीन दर पुढीलप्रमाणे (वरकड खर्चासह संस्थांसाठी) आहेत. त्यामध्ये गाय दूध ( ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी) एक रुपया वाढीमुळे नवीन खरेदी दर प्रतिलिटर ४३ रुपये राहील, तर म्हैस दूध (६.० फॅट व ९.० एसएनएफसाठी) एक रुपया वाढीमुळे नवीन खरेदी दर प्रतिलिटर ५५.२० रुपये राहील.

Katraj Dairy
Early Onion Planting: पाणीटंचाईपूर्वी आगाप कांदा लागवडीची लगबग; आंबेगावच्या पूर्व भागातील शेतकरी चिंतेत

दूध व दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी, दुग्ध व्यवसायातील वाढता उत्पादन खर्च तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा, या उद्देशाने संघाच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाच्या दुधाचा पुरवठा करण्यासाठी दर्जेदार दूध पुरवठा महत्त्वाचा असून, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी संघ सदैव कटिबद्ध असल्याचे संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news