इंदोरी : पुढारी वृत्तसेवा : इंदोरी मावळ येथील कुंडमळा येथे लोखंडी पुला जवळील कुंडदेवी मंदिर येथुन पाय घसरून इंद्रायणी नदीपात्रात एक पर्यटक बेपत्ता झाला आहे.
माहिती नुसार अमित मिश्रा वय 18 वर्ष राहणार इंदिरा कॉलेज परिसर चिंचवड असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. बरोबर असलेल्या चार मित्रांसोबत अमित कुंडमळा येथे फिरण्यासाठी आला होता.
कुंडमळा येथिल लोखंडी पुला जवळ असलेल्या कुंडदेवी मंदिर परिसर येथे अमित ला सेल्फी चा मोह झाला आणि त्या ठिकाणावरून अमित पाय घसरून इंद्रायणी नदीपात्रात मध्ये पडला असे प्रत्यक्ष दर्शी ने सांगितले.
कुंडमळा येथील नदीपात्र धोकादायक असून पाण्याचा प्रवाह देखील तीव्र आहे . तसेच धोकादायक रांजणखळगे असल्या मुळे या परिसरात सदर घटना वारंवार घडत आहेत.
रांजणखळगे असल्यामुळे शोध मोहिमेस त्रास होत आहे.शिवदुर्ग टीम शोध मोहीम करत आहेत.पुढील तपास अधिकारी पोलीस नाईक प्रशांत सोरटे करत आहेत.
पर्यटकांना समजुन सांगुन देखील पर्यटक ऐकत नाही ठीक ठिकाणी धोकादायक बोर्ड लावलेले असताना देखील पर्यटकांची हुलडबाजी या ठिकाणी होत आहे. रांजणखळगी धोकादायक असून आता पर्यंत अनेकांना यांमध्ये आपला प्राण गमवावा लागला आहे असे स्थानिकांनी सांगितले