पुणे

पुणे : दारू न पाजल्याने स्क्रूड्रायव्हर एकाच्या पोटात खुपसला

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दारू पाजली नाही म्हणून एकाला हाताने मारहाण करून पोटात स्क्रूड्रायव्हर खुपसल्याची घटना घडली. ही घटना सोमवारी (दि. 7) रात्री सव्वाबाराच्या सुमारास नेपियर रोड (वानवडी) परिसरात घडली. जगन सोमनाथ हरियाली (वय 35, रा. पिंपरी-चिंचवड) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी हरियाली याने दिलेल्या फिर्यादीनुसार वानवडी पोलिसांनी सनी ऊर्फ बाबा रणजित टाक (वय 28, रा. वानवडी), नावेद शेख (वय 29) या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हरियाली आणि त्याचा मित्र पंड्या भोसले हे दोघे लघुशंकेसाठी थांबले होते. त्या वेळी आरोपी तेथे आले. त्यांनी दोघांसोबत दारू पाजली नाही, या कारणातून वाद घालण्यास सुरुवात केली. त्या वेळी आरोपीपैकी एकाने हरियाली यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण करीत स्क्रूड्रायव्हर त्याच्या पोटात खुपसला तसेच दगड फिर्यादींच्या पायावर मारून जखमी केले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT