SPPU Pudhari
पुणे

SPPU Contractual Professor Recruitment: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १३३ कंत्राटी प्राध्यापक पदांची भरती; पात्र उमेदवारांची यादी जाहीर

८ हजारांहून अधिक अर्जांची छाननी पूर्ण; विविध विभागांमध्ये मानधनावर प्राध्यापक नियुक्ती प्रक्रिया सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये पूर्णवेळ प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरू आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठातर्फे कंत्राटी पद्धतीवर सुमारे १३३ जागा भरल्या जाणार आहेत. या जागांसाठी अर्ज केलेल्या सर्व पात्र उमेदवारांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार https:///admin.unipune.ac.inecruitment/ या लिंक वर जाऊन यादी पाहू शकतात.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांतील रिक्त जागांसाठी आठ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले. त्यातील पात्र उमेदवारांची यादी जाहीर करून मुलाखती घेतल्या जात आहेत. लवकरच पूर्ण वेळ सहयोगी व सहायक प्राध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे. मात्र, त्यासाठी आणखी काही महिने लागणार आहेत.

त्यामुळे विद्यापीठाने कंत्राटी पद्धतीवर पदभरती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. कंत्राटी पद्धतीवर भरती केल्या जाणाऱ्या पदासाठी उमेदवारांनी अर्ज केले. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून तात्पुरती गुणवत्ता यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर शुक्रवारी प्रसिद्ध केली आहे. प्रत्येक उमेदवाराचा एटीआर विचारात घेऊन संबंधित उमेदवाराला गुण देण्यात आले आहेत.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून, विद्यापीठातील सर्व विभागांमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया राबवली जात आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पूर्णवेळ प्राध्यापक उपलब्ध नसल्यामुळे कंत्राटी पद्धतीवर प्राध्यापकांची नियुक्ती केली जात आहे. शैक्षणिक अनुभव, शैक्षणिक पात्रता आणि संशोधन या बाबी विचारात घेऊन उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ५० हजार रुपये एकत्रित मानधन दिले जाणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानवविद्या, आंतरविद्याशाखीय अभ्यास, तसेच इतर विभागांमध्ये ही पदे भरण्यात येणार आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान विभागात जैवतंत्रज्ञान, ऊर्जा अध्ययन, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, पर्यावरणशास्त्र, गणित, माध्यम व संवाद अध्ययन, भौतिकशास्त्र, तंत्रज्ञान, डेटा सायन्स आदी विषयांमध्ये भरती होणार आहे. त्याचबरोबर वाणिज्य, व्यवस्थापन, इंग्रजी, कायदा, इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र, पत्रकारिता, शिक्षण, क्रीडा शिक्षण, संगीत आणि नाट्यकला अशा विविध शाखांतील उमेदवारांनाही संधी उपलब्ध करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT