Saswad Crime Pudhari
पुणे

Saswad Crime: तरुणाला बेदम मारहाण; 6 जणांवर गुन्हा दाखल

सासवडमधील घटना

पुढारी वृत्तसेवा

सासवड: ऑर्केस्ट्रा कार्यक्रमातील किरकोळ वादाच्या कारणावरून पुरंदर तालुक्यातील तक्रारवाडी येथील एका तरुणाला सासवड येथे बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. 30) सकाळी घडली. या प्रकरणी सासवड पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

आदित्य सुरेश खेंगरे (वय 19, रा. तक्रारवाडी, ता. पुरंदर) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, शुभम जगताप व अमर जगताप (दोघे रा. बेलसर, ता. पुरंदर), तसेच इतर तीन ते चार अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 29) रात्री तक्रारवाडी येथे झालेल्या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमादरम्यान बेलसर येथील काही युवक गोंधळ घालत असल्याने त्यांना आवर घालण्याच्या प्रयत्नात किरकोळ वाद झाला होता. त्याचाच राग मनात धरून आरोपींनी दुसऱ्या दिवशी गुरुवारी आदित्यला मारहाण केली.

आदित्य हा त्याचे काका नवनाथ खेंगरे यांच्यासह सासवड येथील नाचन किराणा स्टोअरमध्ये आला होता. या वेळी एक अनोळखी युवक त्याच्याकडे आला व मागील वादाचा जाब विचारत शिवीगाळ करू लागला. काही वेळांतच शुभम जगताप व अमर जगताप (दोघे रा. बेलसर, ता. पुरंदर) तसेच इतर तीन ते चार अनोळखी इसम तेथे येऊन आदित्यला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यापैकी एका आरोपीने कंबरेचा बेल्ट काढून पाठीवर व मानेवर मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

काही वेळांतच शुभम जगताप व अमर जगताप (दोघे रा. बेलसर, ता. पुरंदर) तसेच इतर तीन ते चार अनोळखी इसम तेथे येऊन आदित्यला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यापैकी एका आरोपीने कंबरेचा बेल्ट काढून पाठीवर व मानेवर मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT