Saswad News Pudhari
पुणे

Saswad News: पुण्यातील मद्यधुंद युवक-युवतीचा झेंडेवाडीत गोंधळ; पोलिसांशी उद्धट वर्तन, गुन्हा दाखल

सासवड पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी नीलेश तुकाराम पवार यांनी फिर्याद दिली.

पुढारी वृत्तसेवा

सासवड: पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी परिसरात गुरुवारी पहाटे मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून पोलिसांशी उद्धट वर्तन करणाऱ्या युवक व युवतीवर सासवड पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी किरण संजू झंजोट (वय 29, रा. लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) आणि गाडीतळ, हडपसर, पुणे येथील 31 वर्षीय युवतीवर गुन्हा दाखल झाला आहे. सासवड पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी नीलेश तुकाराम पवार यांनी फिर्याद दिली.

पहाटे चारच्या सुमारास झेंडेवाडी गावाच्या हद्दीतून पोलिसांना फोनद्वारे माहिती मिळाली होती. दोन ते तीन व्यक्ती दुचाकीवरून एका व्यक्तीचा पाठलाग करत असल्याचे कॉलमध्ये सांगण्यात आले होते. त्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.

तेथे किरण झंजोट आणि युवती हे दोघे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता दोघेही सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने आरडाओरडा करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता संबंधितांनी उद्धटपणे वर्तन केल्याचा आरोप आहे. त्यामुळे दोघांनाही ताब्यात घेऊन सासवड पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT