

पुणे: शहरातील लोहगावचा पारा मंगळवारी 44 अंशांवर होता. त्यात गुरुवारी मोठी घट झाली असून, कमाल तापमान 37 ते 41 अंशांवर खाली आले होते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे गुरुवारी प्रचंड उकडा जाणवत होता.
पुणेकरांना यंदाचाही उन्हाळा असह्य होत आहे. कमाल तापमानात घट होत असली तरी ढगाळ वातावरण तयार झाल्याने गुरुवारी प्रचंड उकाडा जाणवत होता.‘ काय हा उकाडा...घर किंवा कार्यालयाबाहेर पडायची हिंम्मत होत नाही असे संवाद गुरुवारी देखील मिळाले !‘
दरम्यान, शहरात आगामी 48 तासांत हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. शहरात 16 मेपर्यंत उकाडा राहील त्यानंतर 17 ते 20 मेदरम्यान हलका पाऊस पडू शकतो.