गट-गणसंख्या कायम, पण रचनेत मोठे बदल; नवीन रचनेत सांगवी गणाचे अस्तित्व संपुष्टात (File Photo)
पुणे

Local Bodies Elections: गट-गणसंख्या कायम, पण रचनेत मोठे बदल; नवीन रचनेत सांगवी गणाचे अस्तित्व संपुष्टात

जवळची गावे वेगवेगळ्या गणांत

पुढारी वृत्तसेवा

बारामती: आगामी जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने गट व गणांची रचना जाहीर केली आहे. बारामती तालुक्यात गट व गणांची संख्या पूर्वीप्रमाणेच अनुक्रमे 6 व 12 अशी राहिली आहे. मात्र, नव्या रचनेत सांगवी गणाचे अस्तिस्व संपुष्टात आले आहे.

गत निवडणुकीत माळेगाव ग्रामपंचायत अस्तित्वात होती. त्यामुळे माळेगाव-पणदरे असा जिल्हा परिषद गट अस्तित्वात होता. आता माळेगावला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने या गटाचेही अस्तित्व संपले आहे. त्याऐवजी आता पणदरे-मुढाळे असा नवीन गट अस्तित्वात आला आहे. (Latest Pune News)

जवळची गावे वेगवेगळ्या गणांत

गट-गणांची रचना करताना काही गावे दूरच्या गणांमध्ये समाविष्ट झाली आहेत. पूर्वी तालुक्यात सांगवी-डोर्लेवाडी असा गट अस्तित्वात होता. तो आता संपुष्टात आला आहे. नव्या रचनेत सांगवी गणाचे अस्तित्व

संपले आहे. सांगवी हे गाव आता पणदरे-मुढाळे गटात समाविष्ट झाले आहे. निंबूत-कांबळेश्वर गटात सोमेश्वरनगरला लागून असणारी करंजेपूल, सोरटेवाडी, सस्तेवाडी, होळ, सदोबाचीवाडी ही गावे कांबळेश्वर गणात गेली आहेत. सुपा-कार्‍हाटी गटामुळे आंबी बुद्रुक व आंबी खुर्द ही जवळ असणारी दोन्ही गावे वेगवेगळ्या गटांत गेली आहेत. अन्य रचनेतही बदल झाले आहेत. त्यामुळे याबाबत मोठ्या प्रमाणात हरकती दाखल होण्याची चिन्हे आहेत.

बारामती तालुक्यातील समाविष्ट गावांसह गट आणि गणरचना :

1. सुपा-कार्‍हाटी गट : सुपा गण - वढाणे, आंबी खुर्द, कुतवळवाडी, भोंडवेवाडी, सुपा, दंडवाडी, चांदगुडेवाडी, काळखैरेवाडी, कोळोली, नारोळी, पानसरेवाडी, बाबुर्डी.

कार्‍हाटी गण : कार्‍हाटी, जळगाव सुपे, अंजनगाव, सोनवडी सुपे, उंडवडी कडेपठार, उंडवडी सुपे, जराडवाडी, खराडेवाडी, कारखेल, देऊळगाव रसाळ, गोजूबावी, बर्‍हाणपूर.

2. शिर्सुफळ- गुणवडी गट :

शिर्सुफळ गण : शिर्सुफळ, पारवडी, निंबोडी, गाडीखेल, कटफळ, जैनकवाडी, वंजारवाडी, साबळेवाडी.

गुणवडी गण : गुणवडी, काटेवाडी, सावळ, कन्हेरी, पिंपळी.

3. पणदरे-मुढाळे गट :

पणदरे गण : सांगवी, धुमाळवाडी, पवईमाळ, मानाप्पावस्ती, म्हसोबानगर, कुरणेवाडी, पणदरे.

मुढाळे गण - मेडद, माळेगाव खुर्द, कर्‍हावागज, सोनकसवाडी, ढाकाळे, भिलारवाडी, मुढाळे, जळगाव कडेपठार, माळवाडी लोणी, सायंबाचीवाडी.

4. वडगाव निंबाळकर- मोरगाव गट

मोरगाव गण : लोणी भापकर, मासाळवाडी, तरडोली, मोरगाव, आंबी बुद्रुक, जोगवडी, मुर्टी, मोराळवाडी, मोढवे, पळशी.

वडगाव निंबाळकर गण : थोपटेवाडी, कोर्‍हाळे बुद्रुक, वडगाव निंबाळकर, चोपडज, पाकी, मगरवाडी, करंजे, चौधरवाडी.

5. निंबूत-कांबळेश्वर गट

निंबूत गण : गडदरवाडी, खंडोबाची वाडी, निंबूत, वाघळवाडी, वाणेवाडी, मुरूम.

कांबळेश्वर गण : करंजेपूल, सोरटेवाडी, सस्तेवाडी, होळ, सदोबाचीवाडी, कोर्‍हाळे खुर्द, लाटे, माळवाडी लाटे, शिरष्णे, कांबळेश्वर.

6. नीरा वागज - डोर्लेवाडी गट

नीरा वागज गण : नीरा वागज, मळद, पाहुणेवाडी, खांडज, शिरवली, ढेकळवाडी, सोनगाव.

डोर्लेवाडी गण : झारगडवाडी, डोर्लेवाडी, मेखळी, घाडगेवाडी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT