पुणे: राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या आरटीई प्रवेश 9 ते 19 जानेवारीनंतर २० ते २७ जानेवारी दरम्यान शाळा नोंदणी तसेच व्हेरिफिकेशनची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु, शाळा नोंदणी न झाल्यामुळे आता ते जानेवारीदरम्यान अंतिम मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती प्राथमिकचे संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण कायद्यांतर्गत आरक्षित जागांवर ऑनलाइन आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. त्यानुसार या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या अनुषंगाने जानेवारीपासून विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्यित शाळा नोंदणी आणि शाळा व्हेरिफिकेशनची लिंक सुरू करण्यात आली आहे. सध्या हजार शाळांची नोंदणी झालेली असून हजार हजार जागा उपलब्ध झाल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शाळा नोंदणीनंतरचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा शाळा व्हेरिफिकेशनचा असतो. तरी या अनुषंगाने सर्व संबंधितांनी शाळा व्हेरिफिकेशन करताना, बंद करण्यात आलेल्या शाळा, अल्पसंख्याक दर्जा शाळा, अनधिकृत शाळा तसेच स्थलांतरीत झालेल्या शाळा आरटीई प्रवेश सन मध्ये प्रविष्ट होणार नाहीत याची खबरदारी घेण्यात यावी. याबाबत सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्यावर निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
तसेच शाळा मान्यता ज्या मंडळाची आहे तेच मंडळ शाळेने नोंदणी करताना निवडले आहे का याची खात्री करण्यात यावी. (उदा. शाळा मान्यता राज्य मंडळाची आहे व शाळेने नोंदणी करताना केंद्रीय मंडळ निवडले आहे.) तरी संबंधित सूचनांचे पालन करून दिलेल्या कालावधीमध्ये विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळा नोंदणी व शाळा व्हेरिफिकेशनची कार्यवाही पूर्ण करावी ही शेवटची मुदतवाढ असून यापुढे कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यार्थी नोंदणी फेबुवारीच्या पहिल्या आठवड्यात
शाळा नोंदणीसाठी आता जानेवारीची मुदत दिल्यानंतर शिक्षण विभागाकडून फेबुवारीच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थी नोंदणीसाठी सुरुवात केली जाणार आहे. सध्या एक लाखांहून अधिक जागा उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये आणखी भर पडणार असून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक लाखांहून अधिक जागा उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालक देखील विद्यार्थी नोंदणीला सुरुवात कधी करणार, याची वारंवार विचारणा करत आहेत. त्यामुळे विद्यार्थी नोंदणीला फेबुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरूवात होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.