Rohit Pawar Pudhari
पुणे

Rohit Pawar Statement: ‘आम्ही काय बोलायचं हे कोणी ठरवू नये’ – रोहित पवारांचा सुनील तटकरेंना फटकारा

भावनिक बोलण्याचा अधिकार माझा आहे; तटकरेंच्या टीकेला रोहित पवारांचे ठाम प्रत्युत्तर

पुढारी वृत्तसेवा

बारामती: आम्ही काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही हे कोणीही आम्हाला सांगू नये अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना फटकारले आहे.

रोहित पवार यांना आमच्या पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही या तटकरे यांनी केलेल्या टीकेला पवार उत्तर देत होते ते म्हणाले ठीक आहे पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार मला नसेल परंतु तटकरे यांना एवढेच मला सांगायचे आहे की भावनिक बोलण्याचा अधिकार मला आहे गेल्या काही महिन्यांमध्ये बऱ्याच गोष्टींबद्दल दादांनी मला जे काही सांगितले आहे ते काही फक्त जवळच्याच लोकांना दादांनी सांगितले आहे.

सर्वच राजकीय लोक सगळे जवळचे असतात असे काही नाही आम्ही भावनिक आहोत आणि भावनिक दृष्टिकोनातून आम्हाला जे काही योग्य वाटेल ते आम्ही विना राजकारण आणता जे आम्ही बोलू शकतो ते आम्ही बोलणार कुणी आम्हाला सांगू नये आम्ही काय बोलायचं आणि बोलायचं नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT